Matthew 18:7 in Marathi 7 अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल.
Other Translations King James Version (KJV) Woe unto the world because of offences! for it must needs be that offences come; but woe to that man by whom the offence cometh!
American Standard Version (ASV) Woe unto the world because of occasions of stumbling! for it must needs be that the occasions come; but woe to that man through whom the occasion cometh!
Bible in Basic English (BBE) A curse is on the earth because of trouble! for it is necessary for trouble to come; but unhappy is that man through whom the trouble comes.
Darby English Bible (DBY) Woe to the world because of offences! For it must needs be that offences come; yet woe to that man by whom the offence comes!
World English Bible (WEB) "Woe to the world because of occasions of stumbling! For it must be that the occasions come, but woe to that person through whom the occasion comes!
Young's Literal Translation (YLT) `Wo to the world from the stumbling-blocks! for there is a necessity for the stumbling-blocks to come, but wo to that man through whom the stumbling-block doth come!
Cross Reference Matthew 13:41 in Marathi 41 मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील, आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना’ जमा करील,
Matthew 23:13 in Marathi 13 “अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो,तुम्हाला हाय हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
Matthew 26:24 in Marathi 24 जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा तो जातो खरा; पण जो त्याचा विश्वासघात करतो त्याला धिक्कार असो! तो मनुष्य जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.
Mark 13:7 in Marathi 7 जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
Luke 17:1 in Marathi 1 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!
John 17:12 in Marathi 12 जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोंपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नांवात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
Acts 1:16 in Marathi 16 बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
Acts 1:18 in Marathi 18 (त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
Romans 2:23 in Marathi 23 जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?
1 Corinthians 11:19 in Marathi 19 यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
2 Thessalonians 2:3 in Marathi 3 कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका;कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष,नाशाचा पुत्र प्रकट होईल;
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
1 Timothy 5:14 in Marathi 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
1 Timothy 6:1 in Marathi 1 जे सर्व दास म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये .
2 Timothy 3:1 in Marathi 1 परंतु शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचा समय आपल्यावर येईल हे समजून घे.
2 Timothy 4:3 in Marathi 3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, .
Titus 2:5 in Marathi 5 आणि त्यांनी समंजस, शुध्दाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू, व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
Titus 2:8 in Marathi 8 आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
2 Peter 2:2 in Marathi 2 पुष्कळ जण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल.
2 Peter 2:15 in Marathi 15 ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि, बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्याला अनीतीचे वेतन प्रिय वाटले.
Jude 1:4 in Marathi 4 कारण, जे ह्या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येक जण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत,त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटुन तिला कामातुर पणाचे स्वरुप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
Jude 1:11 in Marathi 11 त्यांची केवढी दुर्दशा होणार ! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत, आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Revelation 2:20 in Marathi 20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
Revelation 19:20 in Marathi 20 मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. ह्या दोघांनाही गंधकाने जळणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.