Matthew 13:23 in Marathi 23 चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
Other Translations King James Version (KJV) But he that received seed into the good ground is he that heareth the word, and understandeth it; which also beareth fruit, and bringeth forth, some an hundredfold, some sixty, some thirty.
American Standard Version (ASV) And he that was sown upon the good ground, this is he that heareth the word, and understandeth it; who verily beareth fruit, and bringeth forth, some a hundredfold, some sixty, some thirty.
Bible in Basic English (BBE) And the seed which was put in good earth, this is he who gives ear to the word, and gets the sense of it; who gives fruit, some a hundred, some sixty, some thirty times as much.
Darby English Bible (DBY) But he that is sown upon the good ground -- this is he who hears and understands the word, who bears fruit also, and produces, one a hundred, one sixty, and one thirty.
World English Bible (WEB) What was sown on the good ground, this is he who hears the word, and understands it, who most assuredly bears fruit, and brings forth, some one hundred times as much, some sixty, and some thirty."
Young's Literal Translation (YLT) `And that sown on the good ground: this is he who is hearing the word, and is understanding, who indeed doth bear fruit, and doth make, some indeed a hundredfold, and some sixty, and some thirty.'
Cross Reference Matthew 3:8 in Marathi 8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;
Matthew 3:10 in Marathi 10 आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.
Matthew 12:33 in Marathi 33 “जर तुम्हाला चांगले फळ हवे असले, तर झाड चांगले करा. जर तुम्ही झाड चांगले करणार नाही. तर फळही चांगले येणार नाही. कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.
Matthew 13:8 in Marathi 8 काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले
Mark 4:20 in Marathi 20 चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात मग कोणी तीसपट,कोणी साठ पट, कोणी शंभरपट असे पीक देतात.
Mark 10:15 in Marathi 15 मी तुम्हास खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.”
Luke 6:43 in Marathi 43 कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते.
Luke 8:15 in Marathi 15 पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत्, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात, आणि धीराने पीक देत जातात.
Luke 13:9 in Marathi 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”
John 1:11 in Marathi 11 जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
John 8:47 in Marathi 47 जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही एेकत नाही.”
John 10:26 in Marathi 26 तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
John 15:1 in Marathi 1 “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
John 17:7 in Marathi 7 आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत.
Acts 16:14 in Marathi 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती;ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची भक्ति करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले;तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
Acts 17:11 in Marathi 11 तेथील लोक थेस्लनिकांतल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.
2 Corinthians 8:1 in Marathi 1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो.
2 Corinthians 9:10 in Marathi 10 आता जो पेरणार्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Philippians 1:11 in Marathi 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.
Philippians 4:17 in Marathi 17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो.
Colossians 1:6 in Marathi 6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
Colossians 1:10 in Marathi 10 ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
1 Thessalonians 4:1 in Marathi 1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून एेकून घेतले व त्याप्रमाणे वागत आहा, त्यांत तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
2 Thessalonians 2:10 in Marathi 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांंनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अदभूते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
Hebrews 4:2 in Marathi 2 कारण आम्हाला सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
Hebrews 6:7 in Marathi 7 कारण जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.
Hebrews 8:10 in Marathi 10 “त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.
Hebrews 13:15 in Marathi 15 म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या आेठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण' त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.
James 1:21 in Marathi 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.
1 Peter 2:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.