Matthew 13:19 in Marathi 19 वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;
Other Translations King James Version (KJV) When any one heareth the word of the kingdom, and understandeth it not, then cometh the wicked one, and catcheth away that which was sown in his heart. This is he which received seed by the way side.
American Standard Version (ASV) When any one heareth the word of the kingdom, and understandeth it not, `then' cometh the evil `one', and snatcheth away that which hath been sown in his heart. This is he that was sown by the way side.
Bible in Basic English (BBE) When the word of the kingdom comes to anyone, and the sense of it is not clear to him, then the Evil One comes, and quickly takes away that which was put in his heart. He is the seed dropped by the wayside.
Darby English Bible (DBY) From every one who hears the word of the kingdom and does not understand [it], the wicked one comes and catches away what was sown in his heart: this is he that is sown by the wayside.
World English Bible (WEB) When anyone hears the word of the Kingdom, and doesn't understand it, the evil one comes, and snatches away that which has been sown in his heart. This is what was sown by the roadside.
Young's Literal Translation (YLT) Every one hearing the word of the reign, and not understanding -- the evil one doth come, and doth catch that which hath been sown in his heart; this is that sown by the way.
Cross Reference Matthew 4:23 in Marathi 23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, त्याने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. आणि लोकांचे सर्व रोग व आजार बरे केले.
Matthew 5:37 in Marathi 37 तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
Matthew 13:38 in Marathi 38 शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
Mark 4:15 in Marathi 15 वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
Luke 8:11 in Marathi 11 तर दाखला हा आहे : बी हे देवाचे वचन आहे.
Luke 9:2 in Marathi 2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.
Luke 10:9 in Marathi 9 आणि त्यांत जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा, व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
John 3:19 in Marathi 19 आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
John 8:43 in Marathi 43 तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे हेच की, तुम्हाला माझे वचन ऐकवत नाही.
John 18:38 in Marathi 38 पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहुद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
Acts 17:32 in Marathi 32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू
Acts 18:15 in Marathi 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!”
Acts 20:25 in Marathi 25 राज्याची घोषणा करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे
Acts 24:25 in Marathi 25 तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
Acts 25:19 in Marathi 19 उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणा एका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या माणसाशी वाद केला. येशू हा जरी मेलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
Acts 26:31 in Marathi 31 ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते. ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
Romans 1:28 in Marathi 28 आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Romans 2:8 in Marathi 8 परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,
Romans 14:17 in Marathi 17 कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व,शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
2 Thessalonians 2:12 in Marathi 12 ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
Hebrews 2:1 in Marathi 1 ह्या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.
1 John 2:13 in Marathi 13 वडिलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो,मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला आेळखता.
1 John 3:12 in Marathi 12 काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्यांच्या भावाची कृत्ये नीतीची होती.
1 John 5:18 in Marathi 18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.