Mark 8:38 in Marathi 38 या देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
Other Translations King James Version (KJV) Whosoever therefore shall be ashamed of me and of my words in this adulterous and sinful generation; of him also shall the Son of man be ashamed, when he cometh in the glory of his Father with the holy angels.
American Standard Version (ASV) For whosoever shall be ashamed of me and of my words in this adulterous and sinful generation, the Son of man also shall be ashamed of him, when he cometh in the glory of his Father with the holy angels.
Bible in Basic English (BBE) Whoever has a feeling of shame because of me and my words in this false and evil generation, the Son of man will have a feeling of shame because of him, when he comes in the glory of his Father with the holy angels.
Darby English Bible (DBY) For whosoever shall be ashamed of me and of my words in this adulterous and sinful generation, of him shall the Son of man also be ashamed when he shall come in the glory of his Father with the holy angels.
World English Bible (WEB) For whoever will be ashamed of me and of my words in this adulterous and sinful generation, the Son of Man also will be ashamed of him, when he comes in the glory of his Father with the holy angels."
Young's Literal Translation (YLT) for whoever may be ashamed of me, and of my words, in this adulterous and sinful generation, the Son of Man also shall be ashamed of him, when he may come in the glory of his Father, with the holy messengers.'
Cross Reference Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 10:32 in Marathi 32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
Matthew 12:39 in Marathi 39 येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही.
Matthew 13:41 in Marathi 41 मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील, आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना’ जमा करील,
Matthew 16:4 in Marathi 4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
Matthew 16:27 in Marathi 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Matthew 24:30 in Marathi 30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Matthew 26:64 in Marathi 64 येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हाला सांगतोः ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.”
Mark 14:62 in Marathi 62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
Luke 9:26 in Marathi 26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयींची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
Luke 12:8 in Marathi 8 “ जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.
Luke 19:26 in Marathi 26 धन्याने उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल ते सुध्दा काढून घेतले जाईल.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:51 in Marathi 51 आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही ह्यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर चढत उतरत असलेले पहाल.”
John 5:27 in Marathi 27 आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला.
John 12:34 in Marathi 34 लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?”
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Galatians 6:14 in Marathi 14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो.पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
1 Thessalonians 1:7 in Marathi 7 अशाने मासेदोनिया व अखया- ह्यांतील सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.
2 Timothy 1:8 in Marathi 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्या प्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 1:16 in Marathi 16 अनेसिफराच्या घरावर प्रभू दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.
2 Timothy 2:12 in Marathi 12 जर आम्ही दुःखसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुध्दा करू जर आम्ही त्याला नाकारले, तर तोही आम्हाला नाकारील
Hebrews 11:16 in Marathi 16 पण आता, ते अधिक चांगल्या म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
Hebrews 11:26 in Marathi 26 आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण तो प्रतिफळाकडे अचल दृष्टीने पाहत होता.
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
Hebrews 13:13 in Marathi 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
1 John 2:23 in Marathi 23 जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभत नाही, पण जो पुत्राला स्विकारतो त्याला पिता लाभला अाहे.
Jude 1:14 in Marathi 14 आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हटले आहे की, ‘बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.