Mark 8:34 in Marathi 34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे.
Other Translations King James Version (KJV) And when he had called the people unto him with his disciples also, he said unto them, Whosoever will come after me, let him deny himself, and take up his cross, and follow me.
American Standard Version (ASV) And he called unto him the multitude with his disciples, and said unto them, If any man would come after me, let him deny himself, and take up his cross, and follow me.
Bible in Basic English (BBE) And turning to the mass of people with his disciples, he said to them, If any man has the desire to come after me, let him give up all other desires, and take up his cross and come after me.
Darby English Bible (DBY) And having called the crowd with his disciples, he said to them, Whoever desires to come after me, let him deny himself, and take up his cross and follow me.
World English Bible (WEB) He called the multitude to himself with his disciples, and said to them, "Whoever wants to come after me, let him deny himself, and take up his cross, and follow me.
Young's Literal Translation (YLT) And having called near the multitude, with his disciples, he said to them, `Whoever doth will to come after me -- let him disown himself, and take up his cross, and follow me;
Cross Reference Matthew 5:29 in Marathi 29 तुझा उजवा डोळा पापाची सुरूवात करीत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
Matthew 7:13 in Marathi 13 “अरूंद दरवाजाने आत जा. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
Matthew 10:38 in Marathi 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Matthew 27:32 in Marathi 32 ते बाहेर जात असता त्यांना एक शिमोन कुरनेकर नावाचा मनुष्य भेटला.त्यांनी त्याला धरून त्याचा वधस्तंभ वाहायला लावले.
Mark 7:14 in Marathi 14 तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका, व हे समजून घ्या.
Mark 9:43 in Marathi 43 जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.
Mark 10:21 in Marathi 21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रीती वाटले. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे असेल नसेल ते सर्व विकून आणि गोरगरिबांस देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”
Luke 9:23 in Marathi 23 आणि तो सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतः:ला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे.
Luke 13:24 in Marathi 24 अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
Luke 14:26 in Marathi 26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतः:च्या जिवाचासुध्दा व्देष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
Luke 14:33 in Marathi 33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
Luke 18:22 in Marathi 22 जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.”
Luke 20:45 in Marathi 45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते,
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 13:36 in Marathi 36 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”
John 19:17 in Marathi 17 तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यांत घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे ’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. ह्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
John 21:19 in Marathi 19 तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला. आणि हे बोलल्यावर तो त्याला म्हणतो, “माझ्यामागे ये.”
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Romans 6:6 in Marathi 6 आपण जाणतो की, आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
1 Corinthians 4:9 in Marathi 9 कारण मला वाटते की देवाने आम्हाला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जणु तमाशा असे झालो आहोत.
1 Corinthians 8:13 in Marathi 13 म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही.
1 Corinthians 9:19 in Marathi 19 कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.
1 Corinthians 15:31 in Marathi 31 बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो.
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Galatians 5:24 in Marathi 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
Galatians 6:14 in Marathi 14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो.पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
Philippians 3:7 in Marathi 7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे.
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
2 Thessalonians 3:11 in Marathi 11 तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात,असे आम्ही एेकतो.
Titus 2:12 in Marathi 12 ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण ह्या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहीजे;.
Hebrews 13:13 in Marathi 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.
2 Peter 1:14 in Marathi 14 कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.
1 John 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.