Mark 13:9 in Marathi 9 “तुम्ही सावध असा. ते तुम्हाला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हाला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हाला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
Other Translations King James Version (KJV) But take heed to yourselves: for they shall deliver you up to councils; and in the synagogues ye shall be beaten: and ye shall be brought before rulers and kings for my sake, for a testimony against them.
American Standard Version (ASV) But take ye heed to yourselves: for they shall deliver you up to councils; and in synagogues shall ye be beaten; and before governors and kings shall ye stand for my sake, for a testimony unto them.
Bible in Basic English (BBE) But take care: for they will give you up to the Sanhedrins; and in Synagogues you will be whipped; and you will be taken before rulers and kings because of me, for a sign to them.
Darby English Bible (DBY) But *ye*, take heed to yourselves, for they shall deliver you up to sanhedrims and to synagogues: ye shall be beaten and brought before rulers and kings for my sake, for a testimony to them;
World English Bible (WEB) But watch yourselves, for they will deliver you up to councils. You will be beaten in synagogues. You will stand before rulers and kings for my sake, for a testimony to them.
Young's Literal Translation (YLT) `And take ye heed to yourselves, for they shall deliver you up to sanhedrims, and to synagogues, ye shall be beaten, and before governors and kings ye shall be set for my sake, for a testimony to them;
Cross Reference Matthew 10:17 in Marathi 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हाला फटके मारतील.
Matthew 23:34 in Marathi 34 मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल. आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल.
Matthew 24:9 in Marathi 9 “ते तुम्हाला छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हाला जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा व्देष करतील.
Mark 1:44 in Marathi 44 आणि म्हटले “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्याला पटावे म्हणून तू आपल्या शुध्दीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.
Mark 6:11 in Marathi 11 आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.”
Mark 13:5 in Marathi 5 नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
Luke 9:5 in Marathi 5 आणि जितके तुम्हाला अंगीकारीत नाहींत तितक्यांच्याविरुध्द साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.
Luke 21:16 in Marathi 16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील.
John 15:20 in Marathi 20 ‘दास धन्यापेक्षां मोठा नाही' हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याहि पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
John 16:2 in Marathi 2 ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल,अशी वेळ येत आहे.
Acts 4:1 in Marathi 1 पेत्र आणि योहान लोकांशी बोलत असता, याजक व मंदिराचा सरदार व सदूकी हे त्यांच्यावर चालून आले.
Acts 5:17 in Marathi 17 तेव्हा प्रमुख याजक उठला, आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले.
Acts 6:11 in Marathi 11 तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, आम्ही स्तेफनाला मोशेविरूध्द व देवाविरूध्द दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले;
Acts 7:54 in Marathi 54 त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले की, ते दातआेठ खाऊ लागले.
Acts 9:1 in Marathi 1 शौल यरूशलेममध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून तो प्रमुख याजकाकडे गेला.
Acts 9:13 in Marathi 13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरूशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 12:1 in Marathi 1 त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.
Acts 16:20 in Marathi 20 आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हंटले, हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात,
Acts 21:11 in Marathi 11 त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला. त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्याला यरूशलेम येथील यहूदी लोक असेच बांधतील व यहूदीतरांच्या हाती देतील.”
Acts 21:31 in Marathi 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
Acts 22:19 in Marathi 19 तेव्हा मी म्हणालो, प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे;
Acts 23:1 in Marathi 1 मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टि करून म्हणाला, बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.
Acts 24:1 in Marathi 1 पाच दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौला विरुध्द फिर्याद केली.
Acts 25:1 in Marathi 1 मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरूशलेमेस गेला.
1 Corinthians 4:9 in Marathi 9 कारण मला वाटते की देवाने आम्हाला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जणु तमाशा असे झालो आहोत.
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
Philippians 1:29 in Marathi 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 6:9 in Marathi 9 जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.