Luke 8:13 in Marathi 13 आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात, व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
Other Translations King James Version (KJV) They on the rock are they, which, when they hear, receive the word with joy; and these have no root, which for a while believe, and in time of temptation fall away.
American Standard Version (ASV) And those on the rock `are' they who, when they have heard, receive the word with joy; and these have no root, who for a while believe, and in time of temptation fall away.
Bible in Basic English (BBE) And those on the rock are those who with joy give hearing to the word; but having no root, they have faith for a time, and when the test comes they give up.
Darby English Bible (DBY) But those upon the rock, those who when they hear receive the word with joy; and these have no root, who believe for a time, and in time of trial fall away.
World English Bible (WEB) Those on the rock are they who, when they hear, receive the word with joy; but these have no root, who believe for a while, then fall away in time of temptation.
Young's Literal Translation (YLT) `And those upon the rock: They who, when they may hear, with joy do receive the word, and these have no root, who for a time believe, and in time of temptation fall away.
Cross Reference Matthew 13:20 in Marathi 20 खडकावरील पेरलेला तो हा आहे की , तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्विकारतो;
Mark 4:16 in Marathi 16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;
Mark 6:20 in Marathi 20 कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे.
Luke 22:31 in Marathi 31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
John 2:23 in Marathi 23 आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेमात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
John 5:35 in Marathi 35 तो जळता व प्रकाशणारा दिवा होता; आणि तुम्ही काही काळ त्याच्या प्रकाशात हर्ष करण्यास राजी झालात.
John 8:30 in Marathi 30 तो हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
John 12:42 in Marathi 42 तरी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.
John 15:2 in Marathi 2 माझ्यांतील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो.
John 15:6 in Marathi 6 कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
Acts 8:13 in Marathi 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्पा बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अदभूत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.
1 Corinthians 13:2 in Marathi 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
1 Corinthians 15:2 in Marathi 2 जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असल्यास तिच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Galatians 3:4 in Marathi 4 तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय?ह्याला व्यर्थ म्हणावे काय?
Galatians 4:15 in Marathi 15 तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते.
Ephesians 3:17 in Marathi 17 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 2:7 in Marathi 7 तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यात वाढत जा.
1 Thessalonians 3:5 in Marathi 5 ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित सैतानाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
1 Timothy 1:19 in Marathi 19 आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.
2 Timothy 2:18 in Marathi 18 ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात,आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.
Hebrews 10:39 in Marathi 39 परतु ज्यांचा नाश हाेईल अशा 'माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी 'विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.
James 2:26 in Marathi 26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.
2 Peter 2:20 in Marathi 20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
2 Peter 2:22 in Marathi 22 कारण, कुत्रे आपल्या ओकीकडे पुन्हा फिरते, आणि धुतल्या नंतर डुकरीण लोळण्यासाठी घाणीत शिरते, ह्या सार्थ म्हणीप्रमाणे हे त्यांच्या बाबतीत झाले आहे.
1 John 2:19 in Marathi 19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते;त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
Jude 1:12 in Marathi 12 हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत , ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत ते वार्यांबरोबर निघून जाणारे निर्जळ ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मेलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत,