Luke 6:21 in Marathi 21 अहो जे तुम्ही आता भुकेले आहा, ते तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
Other Translations King James Version (KJV) Blessed are ye that hunger now: for ye shall be filled. Blessed are ye that weep now: for ye shall laugh.
American Standard Version (ASV) Blessed `are' ye that hunger now: for ye shall be filled. Blessed `are' ye that weep now: for ye shall laugh.
Bible in Basic English (BBE) Happy are you who are in need of food now: for you will be made full. Happy are you who are weeping now; for you will be glad.
Darby English Bible (DBY) Blessed ye that hunger now, for ye shall be filled. Blessed ye that weep now, for ye shall laugh.
World English Bible (WEB) Blessed are you who hunger now, For you will be filled. Blessed are you who weep now, For you will laugh.
Young's Literal Translation (YLT) `Happy those hungering now -- because ye shall be filled. `Happy those weeping now -- because ye shall laugh.
Cross Reference Matthew 5:4 in Marathi 4 ‘जे शोक करीत आहेत’, ते आशीर्वादित आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल’.
Matthew 5:6 in Marathi 6 जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते आशीर्वादित आहेत, कारण ते संतुष्ट होतील.
Luke 1:53 in Marathi 53 त्याने भुकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे .
Luke 6:25 in Marathi 25 जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हाला दु:ख होवो, कारण तुम्ही भुकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दु:ख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
John 4:10 in Marathi 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
John 6:35 in Marathi 35 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
John 7:37 in Marathi 37 मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे महत्वाच्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेले असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
John 11:35 in Marathi 35 येशू रडला.
John 16:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
Romans 9:1 in Marathi 1 मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही, आणि माझा विवेक, पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
1 Corinthians 4:11 in Marathi 11 अगदी या क्षणापर्यंत आम्ही भूकेले आणि तहानलेले, हलके कपडे घातलेले, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
2 Corinthians 1:4 in Marathi 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की,ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात अाहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
2 Corinthians 6:10 in Marathi 10 आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले, आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
2 Corinthians 7:10 in Marathi 10 कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते.
2 Corinthians 11:27 in Marathi 27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो,
2 Corinthians 12:10 in Marathi 10 आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानांत व आपत्तीत, पाठलागात आणि दुःखांत मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
James 1:2 in Marathi 2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
James 1:12 in Marathi 12 जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुगूट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्याला मिळेल.
1 Peter 1:6 in Marathi 6 आणि ह्या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हाला थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
Revelation 7:16 in Marathi 16 ते आणखी भूकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.
Revelation 21:3 in Marathi 3 आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, ‘पाहा'! देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील. ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.