Luke 22:32 in Marathi 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.
Other Translations King James Version (KJV) But I have prayed for thee, that thy faith fail not: and when thou art converted, strengthen thy brethren.
American Standard Version (ASV) but I made supplication for thee, that thy faith fail not; and do thou, when once thou hast turned again, establish thy brethren.
Bible in Basic English (BBE) But I have made prayer for you, that your faith may not go from you: and when you are turned again, make your brothers strong.
Darby English Bible (DBY) but *I* have besought for thee that thy faith fail not; and *thou*, when once thou hast been restored, confirm thy brethren.
World English Bible (WEB) but I prayed for you, that your faith wouldn't fail. You, when once you have turned again, establish your brothers{The word for "brothers" here may be also correctly translated "brothers and sisters" or "siblings."}."
Young's Literal Translation (YLT) and I besought for thee, that thy faith may not fail; and thou, when thou didst turn, strengthen thy brethren.'
Cross Reference Matthew 18:3 in Marathi 3 आणि म्हटले, “मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
Matthew 26:75 in Marathi 75 नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दुःखतिशयाने रडला.
Mark 14:72 in Marathi 72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व ढसढसा रडला.
Mark 16:7 in Marathi 7 जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.’
Luke 8:13 in Marathi 13 आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात, व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
Luke 22:61 in Marathi 61 आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले. “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्याला आठवले.
John 14:19 in Marathi 19 आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
John 17:9 in Marathi 9 त्यांच्यासाठी मी विनंती करतो,मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
John 17:15 in Marathi 15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,
Romans 5:9 in Marathi 9 मग, आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की, त्याच्या द्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
Romans 8:32 in Marathi 32 आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्याला दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
Romans 8:34 in Marathi 34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
2 Corinthians 1:4 in Marathi 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की,ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात अाहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
1 Timothy 1:13 in Marathi 13 जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो, पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.
2 Timothy 2:18 in Marathi 18 ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात,आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.
Titus 1:1 in Marathi 1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरु तीत ह्यास,सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी निवडलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल,ह्याच्याकडून:
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
Hebrews 12:12 in Marathi 12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
Hebrews 12:15 in Marathi 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊन व इतर लोकांची मने अशुध्द करू नये, म्हणून जपा.
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 1:13 in Marathi 13 म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा; आणि, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
1 Peter 5:8 in Marathi 8 सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावेे म्हणून शोधीत फिरतो.
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
2 Peter 3:17 in Marathi 17 तर प्रियजनहो, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सांपडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये हयासाठी जपून राहा.
1 John 2:1 in Marathi 1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.
1 John 2:19 in Marathi 19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते;त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.