Luke 21:12 in Marathi 12 परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हाला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
Other Translations King James Version (KJV) But before all these, they shall lay their hands on you, and persecute you, delivering you up to the synagogues, and into prisons, being brought before kings and rulers for my name's sake.
American Standard Version (ASV) But before all these things, they shall lay their hands on you, and shall persecute you, delivering you up to the synagogues and prisons, bringing you before kings and governors for my name's sake.
Bible in Basic English (BBE) But before all this, they will take you and be very cruel to you, giving you up to the Synagogues and to prisons, taking you before kings and rulers, because of my name.
Darby English Bible (DBY) But before all these things they shall lay their hands upon you and persecute you, delivering [you] up to synagogues and prisons, bringing [you] before kings and governors on account of my name;
World English Bible (WEB) But before all these things, they will lay their hands on you and will persecute you, delivering you up to synagogues and prisons, bringing you before kings and governors for my name's sake.
Young's Literal Translation (YLT) and before all these, they shall lay on you their hands, and persecute, delivering up to synagogues and prisons, being brought before kings and governors for my name's sake;
Cross Reference Matthew 10:16 in Marathi 16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरूपद्रवी व्हा.
Matthew 22:6 in Marathi 6 काहीनी नोकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले.
Matthew 23:34 in Marathi 34 मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल. आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल.
Matthew 24:9 in Marathi 9 “ते तुम्हाला छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हाला जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा व्देष करतील.
Mark 13:9 in Marathi 9 “तुम्ही सावध असा. ते तुम्हाला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हाला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हाला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
Luke 11:49 in Marathi 49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
John 15:20 in Marathi 20 ‘दास धन्यापेक्षां मोठा नाही' हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याहि पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
John 16:2 in Marathi 2 ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल,अशी वेळ येत आहे.
Acts 4:3 in Marathi 3 तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली, व आता संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यत त्यांना बंदिशाळेत ठेवले.
Acts 5:17 in Marathi 17 तेव्हा प्रमुख याजक उठला, आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले.
Acts 5:40 in Marathi 40 तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि 'येशूच्या नावाने बोलू नका” असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.
Acts 6:12 in Marathi 12 आणि लोकास, वडिलांस व शास्त्र्यास चिथवले. त्यांनी स्तेफनावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले.;
Acts 7:57 in Marathi 57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करीत एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.
Acts 8:3 in Marathi 3 शौलाने रिव्रस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरूष यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे.
Acts 9:4 in Marathi 4 शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”
Acts 12:1 in Marathi 1 त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.
Acts 16:22 in Marathi 22 तेव्हा लोक त्यांच्यावर उठले, आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली.
Acts 21:30 in Marathi 30 सर्व शहर खवळून उठले. सगळे लोक धावू लागले. त्यांनी पौलाला पकडले व मंदिरातून बाहेर ओढून काढले. लगेच दारे बंद करण्यात आली.
Acts 22:30 in Marathi 30 यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.
Acts 24:1 in Marathi 1 पाच दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौला विरुध्द फिर्याद केली.
Acts 25:1 in Marathi 1 मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरूशलेमेस गेला.
Acts 25:11 in Marathi 11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.''
Acts 25:22 in Marathi 22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.” फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”
Acts 26:2 in Marathi 2 “अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहुद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुध्द केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.
1 Thessalonians 2:15 in Marathi 15 त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाहि जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत;
1 Peter 2:13 in Marathi 13 प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याला अधीन राहा.
1 Peter 4:12 in Marathi 12 प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हाला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.