Jude 1:3 in Marathi 3 प्रियांनो, मी आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला ह्याचे अगत्य वाटले की, जो विश्वास पवित्र जनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हाला लिहून उत्तेजन द्यावे.
Other Translations King James Version (KJV) Beloved, when I gave all diligence to write unto you of the common salvation, it was needful for me to write unto you, and exhort you that ye should earnestly contend for the faith which was once delivered unto the saints.
American Standard Version (ASV) Beloved, while I was giving all diligence to write unto you of our common salvation, I was constrained to write unto you exhorting you to contend earnestly for the faith which was once for all delivered unto the saints.
Bible in Basic English (BBE) My loved ones, while my thoughts were full of a letter which I was going to send you about our common salvation, it was necessary for me to send you one requesting you with all my heart to go on fighting strongly for the faith which has been given to the saints once and for ever.
Darby English Bible (DBY) Beloved, using all diligence to write to you of our common salvation, I have been obliged to write to you exhorting [you] to contend earnestly for the faith once delivered to the saints.
World English Bible (WEB) Beloved, while I was very eager to write to you about our common salvation, I was constrained to write to you exhorting you to contend earnestly for the faith which was once for all delivered to the saints.
Young's Literal Translation (YLT) Beloved, all diligence using to write to you concerning the common salvation, I had necessity to write to you, exhorting to agonize for the faith once delivered to the saints,
Cross Reference Acts 4:12 in Marathi 12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही,कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
Acts 6:8 in Marathi 8 स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अदभूते व चिन्हे करत असे.
Acts 9:22 in Marathi 22 परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला. त्याने हे सिध्द केले की, येशू हाच ख्रिस्त आहे. आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते की, दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Acts 17:3 in Marathi 3 त्यांने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे.
Acts 18:4 in Marathi 4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
Acts 18:28 in Marathi 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिध्द केले.
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Acts 28:28 in Marathi 28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.”
Romans 15:15 in Marathi 15 पण मी तुम्हाला आठवण द्यावी म्हणून, तुम्हाला काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हाला लिहिले आहे.
1 Corinthians 15:3 in Marathi 3 कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले,त्यापैकी महत्वाचे हे आहे की, शास्त्रवचनाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी मरण पावला
Galatians 2:5 in Marathi 5 सुवार्तेचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
Galatians 3:28 in Marathi 28 यहूदी किंवा हेल्लेणी, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही; कारण ख्रिस्त येशूत तुम्ही सर्वजण एकच आहा.
Galatians 6:11 in Marathi 11 पाहा, किती मोठ्या अक्षरांनी, मी तुम्हाला स्वहस्ते लिहित आहे.
Ephesians 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तावर विश्वासूपणे भाव ठेवणाऱ्यांना, इफिस येथील देवाच्या पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित, पौल याजकडून
Philippians 1:1 in Marathi 1 पौल व तिमथ्य, ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून; फिलिपै येथे ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जणांस, त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यांस सलाम;
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Colossians 1:2 in Marathi 2 कलस्सैमधील येथील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांसः देव आपला पिता ह्याजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
1 Thessalonians 2:2 in Marathi 2 परंतु पूर्वीं फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, (हे तुम्हाला माहीतच आहे,) मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
1 Timothy 1:18 in Marathi 18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.
1 Timothy 6:12 in Marathi 12 विश्वासा संबंधी चांगले युध्द कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,
2 Timothy 1:13 in Marathi 13 ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्या पासून ऐकून घेतला , तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
2 Timothy 4:7 in Marathi 7 मी सुयुध्द केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
Titus 1:4 in Marathi 4 देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो ह्याच्यापासून कृपा,दया व शांती असो.
Hebrews 13:22 in Marathi 22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हाला करतो.
1 Peter 5:12 in Marathi 12 मी ज्या सिल्वान ला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हाला थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. हित तुम्ही स्थिर रहा.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
2 Peter 1:12 in Marathi 12 ह्या कारणास्तव, जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहित आहेत, आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हाला त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.
2 Peter 3:1 in Marathi 1 प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहित आहे, ह्या दोहीमध्ये मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे.
Jude 1:17 in Marathi 17 पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा;
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 12:11 in Marathi 11 त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.