Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Other Translations King James Version (KJV) Jude, the servant of Jesus Christ, and brother of James, to them that are sanctified by God the Father, and preserved in Jesus Christ, and called:
American Standard Version (ASV) Jude, a servant of Jesus Christ, and brother of James, to them that are called, beloved in God the Father, and kept for Jesus Christ:
Bible in Basic English (BBE) Jude, a servant of Jesus Christ and the brother of James, to those of God's selection who have been made holy by God the Father and are kept safe for Jesus Christ:
Darby English Bible (DBY) Jude, bondman of Jesus Christ, and brother of James, to the called ones beloved in God [the] Father and preserved in Jesus Christ:
World English Bible (WEB) Jude, a servant of Jesus Christ, and brother of James, to those who are called, sanctified by God the Father, and kept for Jesus Christ:
Young's Literal Translation (YLT) Judas, of Jesus Christ a servant, and brother of James, to those sanctified in God the Father, and in Jesus Christ kept -- called,
Cross Reference Matthew 10:3 in Marathi 3 फिलिप्प व बर्थलमय,थोमा आणि मत्तय जकातदार,अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय
Mark 3:18 in Marathi 18 अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
Luke 6:16 in Marathi 16 याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
John 6:39 in Marathi 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
John 14:22 in Marathi 22 यहुदा त्याला म्हणाला, (इस्कार्योत नव्हे), “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
John 17:15 in Marathi 15 तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
John 17:17 in Marathi 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
John 17:19 in Marathi 19 आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.
Acts 1:13 in Marathi 13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय,अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते तिथे गेले;
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
Acts 27:23 in Marathi 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 6:22 in Marathi 22 पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हाला पवित्रीकरण हे फळ आहे, आणि शेवट सार्वकालिक जीवन आहे.
Romans 8:30 in Marathi 30 आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
Romans 9:24 in Marathi 24 त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
Ephesians 5:26 in Marathi 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 5:23 in Marathi 23 आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 4:18 in Marathi 18 प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
Hebrews 3:1 in Marathi 1 म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहो, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा प्रमुख याजक आहे.
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
1 Peter 1:2 in Marathi 2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून