John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
Other Translations King James Version (KJV) Labour not for the meat which perisheth, but for that meat which endureth unto everlasting life, which the Son of man shall give unto you: for him hath God the Father sealed.
American Standard Version (ASV) Work not for the food which perisheth, but for the food which abideth unto eternal life, which the Son of man shall give unto you: for him the Father, even God, hath sealed.
Bible in Basic English (BBE) Let your work not be for the food which comes to an end, but for the food which goes on for eternal life, which the Son of man will give to you, for on him has God the Father put his mark.
Darby English Bible (DBY) Work not [for] the food which perishes, but [for] the food which abides unto life eternal, which the Son of man shall give to you; for him has the Father sealed, [even] God.
World English Bible (WEB) Don't work for the food which perishes, but for the food which remains to eternal life, which the Son of Man will give to you. For God the Father has sealed him."
Young's Literal Translation (YLT) work not for the food that is perishing, but for the food that is remaining to life age-during, which the Son of Man will give to you, for him did the Father seal -- `even' God.'
Cross Reference Matthew 3:17 in Marathi 17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.
Matthew 6:19 in Marathi 19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील.
Matthew 6:31 in Marathi 31 “आम्ही काय खावे, प्यावे, पांघरावे? असे म्हणून त्यांची चिंता करू नका.
Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 17:5 in Marathi 5 तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Mark 1:11 in Marathi 11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
Mark 9:7 in Marathi 7 तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
Luke 3:22 in Marathi 22 आणि पवित्र आत्मा देह रूपाने कबुतरा प्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 9:35 in Marathi 35 आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका
Luke 10:40 in Marathi 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
John 1:33 in Marathi 33 मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’
John 3:33 in Marathi 33 ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ ह्यावर आपला शिक्का लावला आहे.
John 4:13 in Marathi 13 येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल,
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 6:28 in Marathi 28 तेव्हा ते त्याला म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?”
John 6:40 in Marathi 40 माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”
John 6:51 in Marathi 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.
John 6:54 in Marathi 54 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन.
John 6:58 in Marathi 58 स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.‘
John 6:68 in Marathi 68 तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत.
John 8:18 in Marathi 18 मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे, आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोही माझ्याविषयी साक्ष देतो.”
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 10:37 in Marathi 37 मी जर माझ्या पित्याची कामें करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
John 11:25 in Marathi 25 येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
John 11:42 in Marathi 42 मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस,तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरितां मी बोललो,ह्यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.”
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 15:24 in Marathi 24 जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाहि पाहिले आहे व आमचा व्देष केला आहे.
John 17:2 in Marathi 2 जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.
Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Acts 10:38 in Marathi 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
Romans 4:11 in Marathi 11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे.
Romans 6:23 in Marathi 23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. *
1 Corinthians 6:13 in Marathi 13 '' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे”; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे .
1 Corinthians 7:29 in Marathi 29 पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना बायका आहेत त्यांना बायका नसल्यासारखे त्यांनी जगावे;
1 Corinthians 9:2 in Marathi 2 मी इतरांकरता जरी प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे. कारण, तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहा.
1 Corinthians 9:24 in Marathi 24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की,ते तुम्ही मिळवाल.
2 Corinthians 4:18 in Marathi 18 आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही, पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो. कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
Galatians 5:6 in Marathi 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
Philippians 2:13 in Marathi 13 कारण इच्छा करणे आणि कार्य करणे ही तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
Colossians 1:29 in Marathi 29 ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्याठायी सामर्थ्यानें त्याचे कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
Colossians 2:22 in Marathi 22 अशा नियमांतील सर्व गोष्टी ह्या उपभोगाने नष्ट होणार्या गोष्टी आहेत.
Colossians 3:2 in Marathi 2 वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका;
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 12:16 in Marathi 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
James 1:11 in Marathi 11 सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फूल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.
1 Peter 1:24 in Marathi 24 कारण, ‘सर्व मानवजाती गवतासारखी आहे,व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते,
2 Peter 1:17 in Marathi 17 कारण त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा एेश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा प्रिय पुत्र,मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे’.
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?