John 17:6 in Marathi 6 “ जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.
Other Translations King James Version (KJV) I have manifested thy name unto the men which thou gavest me out of the world: thine they were, and thou gavest them me; and they have kept thy word.
American Standard Version (ASV) I manifested thy name unto the men whom thou gavest me out of the world: thine they were, and thou gavest them to me; and they have kept thy word.
Bible in Basic English (BBE) I have given knowledge of your name to the men whom you gave me out of the world: yours they were, and you gave them to me, and they have kept your words.
Darby English Bible (DBY) I have manifested thy name to the men whom thou gavest me out of the world. They were thine, and thou gavest them me, and they have kept thy word.
World English Bible (WEB) I revealed your name to the people whom you have given me out of the world. They were yours, and you have given them to me. They have kept your word.
Young's Literal Translation (YLT) I did manifest Thy name to the men whom Thou hast given to me out of the world; Thine they were, and to me Thou hast given them, and Thy word they have kept;
Cross Reference Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Luke 10:21 in Marathi 21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुध्दीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
John 1:18 in Marathi 18 देवाला कोणीहीं कधीच पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र जन्मलेला पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
John 6:37 in Marathi 37 पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्याला मी कधीच घालवणार नाही.
John 6:39 in Marathi 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 12:28 in Marathi 28 हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” तेव्हा आकाशवाणी झाली, ‘मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.’
John 14:21 in Marathi 21 ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन.”
John 15:3 in Marathi 3 जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुध्द झालांच आहा.
John 15:7 in Marathi 7 तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.
John 15:19 in Marathi 19 जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा व्देष करते.
John 17:2 in Marathi 2 जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.
John 17:9 in Marathi 9 त्यांच्यासाठी मी विनंती करतो,मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
John 17:14 in Marathi 14 मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.
John 17:16 in Marathi 16 जसा मी जगाचा नाही, तसे तेहि जगाचे नाहींत.
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
John 17:26 in Marathi 26 मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
John 18:9 in Marathi 9 ‘जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,’ असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
Acts 13:48 in Marathi 48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाला त्यांनी गौरव दिले . आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Romans 11:2 in Marathi 2 देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने सोडले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Colossians 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंत:करणात स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 1:13 in Marathi 13 ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्या पासून ऐकून घेतला , तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
Hebrews 2:12 in Marathi 12 तो म्हणतो, “मी तुझे नाव माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.”
Hebrews 3:6 in Marathi 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 3:8 in Marathi 8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.