John 17:11 in Marathi 11 आणि आता, ह्यापुढे मी जगात नाही; पण ते जगांत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
Other Translations King James Version (KJV) And now I am no more in the world, but these are in the world, and I come to thee. Holy Father, keep through thine own name those whom thou hast given me, that they may be one, as we are.
American Standard Version (ASV) And I am no more in the world, and these are in the world, and I come to thee. Holy Father, keep them in thy name which thou hast given me, that they may be one, even as we `are'.
Bible in Basic English (BBE) And now I will be no longer in the world, but they are in the world and I come to you. Holy Father, keep them in your name which you have given to me, so that they may be one even as we are one.
Darby English Bible (DBY) And I am no longer in the world, and these are in the world, and I come to thee. Holy Father, keep them in thy name which thou hast given me, that they may be one as we.
World English Bible (WEB) I am no more in the world, but these are in the world, and I am coming to you. Holy Father, keep them through your name which you have given me, that they may be one, even as we are.
Young's Literal Translation (YLT) and no more am I in the world, and these are in the world, and I come unto Thee. Holy Father, keep them in Thy name, whom Thou hast given to me, that they may be one as we;
Cross Reference Matthew 5:48 in Marathi 48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा’.
Matthew 6:9 in Marathi 9 म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी. ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
Matthew 10:16 in Marathi 16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरूपद्रवी व्हा.
John 7:33 in Marathi 33 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडावेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
John 10:29 in Marathi 29 पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही .
John 13:1 in Marathi 1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, ह्या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
John 13:3 in Marathi 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 15:18 in Marathi 18 “जग जर तुमचा व्देष करते तर तुमचा व्देष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.
John 16:28 in Marathi 28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
John 17:12 in Marathi 12 जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोंपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नांवात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 17:25 in Marathi 25 हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे .
Acts 1:9 in Marathi 9 असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला; आणि मेघांनी त्याला दृष्टीआड केले.
Acts 3:21 in Marathi 21 सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यत स्वर्गात त्याला राहणे अवश्य आहे; त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र भविष्यवाद्याच्या तोंडून सांगितले आहे
Romans 9:17 in Marathi 17 म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’
Romans 12:5 in Marathi 5 तसे आपण पुष्कळ असून, ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण, एक , एकमेकांचे अवयव आहोत.
Romans 15:5 in Marathi 5 आता, जो धीर व उत्तेजन देतो, तो देव तुम्हाला असे देवो की, तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;
1 Corinthians 1:10 in Marathi 10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
1 Corinthians 12:12 in Marathi 12 कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात, आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
Galatians 3:28 in Marathi 28 यहूदी किंवा हेल्लेणी, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही; कारण ख्रिस्त येशूत तुम्ही सर्वजण एकच आहा.
Ephesians 4:4 in Marathi 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास पाचारण केले आहे.
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 9:24 in Marathi 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 1:15 in Marathi 15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
1 John 3:12 in Marathi 12 काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्यांच्या भावाची कृत्ये नीतीची होती.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 4:8 in Marathi 8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखावर आणि पंखाखालीसुध्दा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होतेः “पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे. ”
Revelation 15:4 in Marathi 4 हे प्रभू, कोण तुला भिणार नाही आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस. कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत. ’
Revelation 19:12 in Marathi 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुगुट होते. आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.