John 15:4 in Marathi 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याला आपल्याआपण फळ देतां येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.
Other Translations King James Version (KJV) Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit of itself, except it abide in the vine; no more can ye, except ye abide in me.
American Standard Version (ASV) Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit of itself, except it abide in the vine; so neither can ye, except ye abide in me.
Bible in Basic English (BBE) Be in me at all times as I am in you. As the branch is not able to give fruit of itself, if it is not still on the vine, so you are not able to do so if you are not in me.
Darby English Bible (DBY) Abide in me and I in you. As the branch cannot bear fruit of itself unless it abide in the vine, thus neither [can] ye unless ye abide in me.
World English Bible (WEB) Remain in me, and I in you. As the branch can't bear fruit by itself, unless it remains in the vine, so neither can you, unless you remain in me.
Young's Literal Translation (YLT) remain in me, and I in you, as the branch is not able to bear fruit of itself, if it may not remain in the vine, so neither ye, if ye may not remain in me.
Cross Reference Luke 8:15 in Marathi 15 पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत्, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात, आणि धीराने पीक देत जातात.
John 6:56 in Marathi 56 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो.
John 6:68 in Marathi 68 तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत.
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 15:5 in Marathi 5 मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करितां येत नाही.
John 17:23 in Marathi 23 म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरहि प्रीती केली.
Acts 11:23 in Marathi 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Romans 8:9 in Marathi 9 पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहा. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.
2 Corinthians 12:8 in Marathi 8 माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.
2 Corinthians 13:5 in Marathi 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही , म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Ephesians 3:17 in Marathi 17 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,
Philippians 1:11 in Marathi 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Colossians 2:6 in Marathi 6 आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला.
1 Thessalonians 3:5 in Marathi 5 ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित सैतानाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
Hebrews 10:39 in Marathi 39 परतु ज्यांचा नाश हाेईल अशा 'माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी 'विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.
1 John 2:6 in Marathi 6 मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशूख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
1 John 2:24 in Marathi 24 तुमच्या विषयी जे म्हणावयाचे तर,जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून एेकले ते जर तुम्हामध्ये राहिले,तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
2 John 1:9 in Marathi 9 ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहतां जो पुढेंपुढेंच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे.
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,