John 11:42 in Marathi 42 मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस,तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरितां मी बोललो,ह्यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.”
Other Translations King James Version (KJV) And I knew that thou hearest me always: but because of the people which stand by I said it, that they may believe that thou hast sent me.
American Standard Version (ASV) And I knew that thou hearest me always: but because of the multitude that standeth around I said it, that they may believe that thou didst send me.
Bible in Basic English (BBE) I was certain that your ears are at all times open to me, but I said it because of these who are here, so that they may see that you sent me.
Darby English Bible (DBY) but I knew that thou always hearest me; but on account of the crowd who stand around I have said [it], that they may believe that thou hast sent me.
World English Bible (WEB) I know that you always listen to me, but because of the multitude that stands around I said this, that they may believe that you sent me."
Young's Literal Translation (YLT) and I knew that Thou always dost hear me, but, because of the multitude that is standing by, I said `it', that they may believe that Thou didst send me.'
Cross Reference Matthew 12:22 in Marathi 22 मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.
Matthew 26:53 in Marathi 53 मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हाला कळत नाही काय?
John 3:17 in Marathi 17 कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
John 6:38 in Marathi 38 कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे.
John 7:28 in Marathi 28 ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्याला तुम्ही ओळखत नाही.
John 8:16 in Marathi 16 आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे. कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे.
John 8:29 in Marathi 29 ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एेकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्याला आवडणार्या गोष्टी करतो.”
John 8:42 in Marathi 42 येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले.
John 9:24 in Marathi 24 तेव्हा जो मनुष्य अांधळा होता त्याला त्यांनी दुसर्यांदा बोलावले आणि ते त्याला म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
John 10:36 in Marathi 36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले,त्या मला,मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
John 11:22 in Marathi 22 तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल,हे मला ठाऊक आहे.”
John 11:31 in Marathi 31 तेव्हा जे यहूदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरिया घाईघाईने उठून बाहेर जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागें गेले.
John 11:45 in Marathi 45 तेव्हा मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी त्याने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;
John 12:27 in Marathi 27 “आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू?हे बापा, तू ह्या घटकेपासून माझे रक्षण कर.पण मी ह्या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
John 17:8 in Marathi 8 कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर आेळखले, आणि तू मला पाठवले.असा त्यांनी विश्वास ठेवला.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 17:25 in Marathi 25 हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे .
John 20:31 in Marathi 31 पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
Hebrews 5:7 in Marathi 7 येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
1 John 4:9 in Marathi 9 देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.
1 John 4:14 in Marathi 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे.