James 1:25 in Marathi 25 परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो, आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.
Other Translations King James Version (KJV) But whoso looketh into the perfect law of liberty, and continueth therein, he being not a forgetful hearer, but a doer of the work, this man shall be blessed in his deed.
American Standard Version (ASV) But he that looketh into the perfect law, the `law' of liberty, and `so' continueth, being not a hearer that forgetteth but a doer that worketh, this man shall be blessed in his doing.
Bible in Basic English (BBE) But he who goes on looking into the true law which makes him free, being not a hearer without memory but a doer putting it into effect, this man will have a blessing on his acts.
Darby English Bible (DBY) But *he* that fixes his view on [the] perfect law, that of liberty, and abides in [it], being not a forgetful hearer but a doer of [the] work, *he* shall be blessed in his doing.
World English Bible (WEB) But he who looks into the perfect law, the law of freedom, and continues, not being a hearer who forgets but a doer of the work, this man will be blessed in what he does.
Young's Literal Translation (YLT) and he who did look into the perfect law -- that of liberty, and did continue there, this one -- not a forgetful hearer becoming, but a doer of work -- this one shall be happy in his doing.
Cross Reference Luke 6:47 in Marathi 47 प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हाला दाखवितो.
Luke 11:28 in Marathi 28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित!”
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
John 8:36 in Marathi 36 म्हणून जर पुत्राने तुम्हाला बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
John 13:17 in Marathi 17 जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तर तुम्ही धन्य आहा.
John 15:9 in Marathi 9 जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीहि तुम्हावर प्रीती केली; तुम्ही माझ्या प्रीतीत रहा.
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Acts 13:43 in Marathi 43 भास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.”
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 7:12 in Marathi 12 म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
Romans 7:22 in Marathi 22 कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;
Romans 8:15 in Marathi 15 कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.
Romans 11:22 in Marathi 22 तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाहीतर, तूही छाटला जाशील.
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2 Corinthians 3:17 in Marathi 17 आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.
2 Corinthians 13:5 in Marathi 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही , म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Galatians 5:1 in Marathi 1 ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यात तुम्ही टिकून राहा, आणि दासत्वाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
1 Timothy 2:15 in Marathi 15 तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास व प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
1 Timothy 4:16 in Marathi 16 आपणाकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.
Hebrews 12:15 in Marathi 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊन व इतर लोकांची मने अशुध्द करू नये, म्हणून जपा.
James 1:23 in Marathi 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या माणसासारखा आहे.
James 2:12 in Marathi 12 तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.
1 Peter 2:16 in Marathi 16 तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे
1 John 2:24 in Marathi 24 तुमच्या विषयी जे म्हणावयाचे तर,जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून एेकले ते जर तुम्हामध्ये राहिले,तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
Revelation 14:13 in Marathi 13 आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः ‘आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य होत. ’ आत्मा म्हणतो, ‘हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा. कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे जातात. ’
Revelation 22:14 in Marathi 14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा अधिकार राहील.