Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
Other Translations King James Version (KJV) So Christ was once offered to bear the sins of many; and unto them that look for him shall he appear the second time without sin unto salvation.
American Standard Version (ASV) so Christ also, having been once offered to bear the sins of many, shall appear a second time, apart from sin, to them that wait for him, unto salvation.
Bible in Basic English (BBE) So Christ, having at his first coming taken on himself the sins of men, will be seen a second time, without sin, by those who are waiting for him, for their salvation.
Darby English Bible (DBY) thus the Christ also, having been once offered to bear the sins of many, shall appear to those that look for him the second time without sin for salvation.
World English Bible (WEB) so Christ also, having been once offered to bear the sins of many, will appear a second time, without sin, to those who are eagerly waiting for him for salvation.
Young's Literal Translation (YLT) so also the Christ, once having been offered to bear the sins of many, a second time, apart from a sin-offering, shall appear, to those waiting for him -- to salvation!
Cross Reference Matthew 26:28 in Marathi 28 कारण हे माझे कराराचे रक्त आहे.हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.
John 14:3 in Marathi 3 आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
Acts 1:11 in Marathi 11 ते म्हणाले अहो गालीलकारांनो ,तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जातांना पाहिले, तसाच परत येईल.
Romans 5:15 in Marathi 15 पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मेले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त ह्या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.
Romans 6:10 in Marathi 10 कारण तो मेला तो पापासाठी एकदाच मेला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 8:23 in Marathi 23 आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची,म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहो.
1 Corinthians 1:7 in Marathi 7 म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता.
1 Corinthians 15:54 in Marathi 54 हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मर्त्य आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा “विजयात मरण गिळले गेले आहे.”
Philippians 3:20 in Marathi 20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहो.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 Thessalonians 4:14 in Marathi 14 कारण येशू मेला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
2 Thessalonians 2:1 in Marathi 1 बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की,
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Hebrews 4:15 in Marathi 15 कारण आपल्याला लाभलेला प्रमुख याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
Hebrews 9:25 in Marathi 25 जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी दुसऱ्याचे रक्त घेऊन जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात स्वत:ला अर्पायला जात नाही.
1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
2 Peter 3:12 in Marathi 12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तापून वितळतील.
1 John 3:2 in Marathi 2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.