Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Other Translations King James Version (KJV) How much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, purge your conscience from dead works to serve the living God?
American Standard Version (ASV) how much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without blemish unto God, cleanse your conscience from dead works to serve the living God?
Bible in Basic English (BBE) How much more will the blood of Christ, who, being without sin, made an offering of himself to God through the Holy Spirit, make your hearts clean from dead works to be servants of the living God?
Darby English Bible (DBY) how much rather shall the blood of the Christ, who by the eternal Spirit offered himself spotless to God, purify your conscience from dead works to worship [the] living God?
World English Bible (WEB) how much more will the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without blemish to God, cleanse your conscience from dead works to serve the living God?
Young's Literal Translation (YLT) how much more shall the blood of the Christ (who through the age-during Spirit did offer himself unblemished to God) purify your conscience from dead works to serve the living God?
Cross Reference Matthew 7:11 in Marathi 11 वाईट असूनही जर तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील.
Matthew 12:28 in Marathi 28 परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Luke 1:74 in Marathi 74 ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रुंच्या हातून सुटून
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 12:24 in Marathi 24 कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!
Luke 12:28 in Marathi 28 तर, जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हाला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!
John 3:34 in Marathi 34 कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
Acts 1:2 in Marathi 2 त्या दिवसा पर्यत पवित्र आत्म्याने जे जे आज्ञापिले व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला.
Acts 10:38 in Marathi 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
Acts 14:15 in Marathi 15 लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हाला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
Romans 1:4 in Marathi 4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे, मेलेल्यातून पुन्हा उठण्याने, तो सामर्थ्याने, देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
Romans 1:20 in Marathi 20 कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकालचे सामर्थ्य व देवपण ह्या त्याच्या अदृष्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Romans 6:22 in Marathi 22 पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हाला पवित्रीकरण हे फळ आहे, आणि शेवट सार्वकालिक जीवन आहे.
Romans 11:12 in Marathi 12 आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले, आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
Romans 11:24 in Marathi 24 कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
2 Corinthians 6:16 in Marathi 16 आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
Galatians 2:19 in Marathi 19 कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो आहे, ह्यासाठी की,मी देवाकरता जगावे.
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
1 Thessalonians 1:9 in Marathi 9 कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास,
1 Timothy 1:17 in Marathi 17 आता सर्वकालचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
1 Timothy 3:15 in Marathi 15 तरी मला उशीर लागल्यास , देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे , हे तुला समजावे.
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 6:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चाताप
Hebrews 7:27 in Marathi 27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे.
Hebrews 9:7 in Marathi 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
Hebrews 9:9 in Marathi 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव परिपूर्ण होऊ शकत नाही.
Hebrews 9:12 in Marathi 12 बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
Hebrews 10:2 in Marathi 2 जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुध्द झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.
Hebrews 10:22 in Marathi 22 म्हणून आपण आपली मलीन विवेकबुद्धि शुध्द करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने असे खऱ्या अंतःकरणाने विश्र्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
Hebrews 11:21 in Marathi 21 विश्वासाने, याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले.
1 Peter 1:19 in Marathi 19 निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहा.
1 Peter 2:22 in Marathi 22 त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 John 1:7 in Marathi 7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;