Hebrews 7:26 in Marathi 26 म्हणून अगदी असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुध्द आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
Other Translations King James Version (KJV) For such an high priest became us, who is holy, harmless, undefiled, separate from sinners, and made higher than the heavens;
American Standard Version (ASV) For such a high priest became us, holy, guileless, undefiled, separated from sinners, and made higher than the heavens;
Bible in Basic English (BBE) It was right for us to have such a high priest, one who is holy and without evil, doing no wrong, having no part with sinners, and made higher than the heavens:
Darby English Bible (DBY) For such a high priest became us, holy, harmless, undefiled, separated from sinners, and become higher than the heavens:
World English Bible (WEB) For such a high priest was fitting for us: holy, guiltless, undefiled, separated from sinners, and made higher than the heavens;
Young's Literal Translation (YLT) For such a chief priest did become us -- kind, harmless, undefiled, separate from the sinners, and become higher than the heavens,
Cross Reference Matthew 27:18 in Marathi 18 कारण त्याला कळले होते की, त्यांनी त्याला मत्सराने धरून दिले होते.
Mark 16:19 in Marathi 19 मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
Luke 1:35 in Marathi 35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
Luke 23:22 in Marathi 22 पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, का ? या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुध्द काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
Luke 23:41 in Marathi 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.
Luke 23:47 in Marathi 47 जेव्हा रोमी सेनाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, 'खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.'
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
Luke 24:46 in Marathi 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,
John 8:29 in Marathi 29 ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एेकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्याला आवडणार्या गोष्टी करतो.”
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
Acts 3:14 in Marathi 14 तुम्ही तर जो पवित्र व न्यायी त्याला नाकारले, आणि घातक माणूस आम्हाला द्यावा, असे मागितले;
Acts 4:27 in Marathi 27 कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरूध्द ह्या नगरात परराष्ट्रीय व इस्त्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले,
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Ephesians 4:8 in Marathi 8 “ वचन असे म्हणते. “जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युध्दकैदयास कैद करून नेले, आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.,
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 2:10 in Marathi 10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने त्याला त्याच्या दुःखसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Hebrews 7:11 in Marathi 11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले, पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता.
Hebrews 8:1 in Marathi 1 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे कीः असा मुख्य याजक आम्हाला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Hebrews 9:23 in Marathi 23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुध्द करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुध्द केल्या जातात.
Hebrews 10:11 in Marathi 11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
1 Peter 1:19 in Marathi 19 निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहा.
1 Peter 2:22 in Marathi 22 त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
1 Peter 3:22 in Marathi 22 तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे; आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
1 John 2:2 in Marathi 2 तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
Revelation 1:17 in Marathi 17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
Revelation 3:7 in Marathi 7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत_ ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.