Hebrews 3:6 in Marathi 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
Other Translations King James Version (KJV) But Christ as a son over his own house; whose house are we, if we hold fast the confidence and the rejoicing of the hope firm unto the end.
American Standard Version (ASV) but Christ as a son, over his house; whose house are we, if we hold fast our boldness and the glorying of our hope firm unto the end.
Bible in Basic English (BBE) But Christ as a son, over his house; whose house are we, if we keep our hearts fixed in the glad and certain hope till the end.
Darby English Bible (DBY) but Christ, as Son over his house, whose house are *we*, if indeed we hold fast the boldness and the boast of hope firm to the end.
World English Bible (WEB) but Christ is faithful as a Son over his house; whose house we are, if we hold fast our confidence and the glorying of our hope firm to the end.
Young's Literal Translation (YLT) and Christ, as a Son over his house, whose house are we, if the boldness and the rejoicing of the hope unto the end we hold fast.
Cross Reference Matthew 10:22 in Marathi 22 माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.
Matthew 16:18 in Marathi 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.
Matthew 24:13 in Marathi 13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
John 3:35 in Marathi 35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 11:22 in Marathi 22 तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाहीतर, तूही छाटला जाशील.
Romans 12:12 in Marathi 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
1 Corinthians 3:16 in Marathi 16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही काय?
1 Corinthians 6:19 in Marathi 19 किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही?
2 Corinthians 6:16 in Marathi 16 आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
Galatians 6:9 in Marathi 9 आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.
Ephesians 2:21 in Marathi 21 संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. “
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
1 Thessalonians 5:16 in Marathi 16 सदोदित आनंद करा.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 3:15 in Marathi 15 तरी मला उशीर लागल्यास , देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे , हे तुला समजावे.
Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
Hebrews 3:2 in Marathi 2 ज्या देवाने त्याला प्रेषित व प्रमुख याजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता.
Hebrews 3:14 in Marathi 14 कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Hebrews 6:11 in Marathi 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
Hebrews 10:23 in Marathi 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
Hebrews 10:35 in Marathi 35 म्हणून धैर्य सोडू नका,त्याचे प्रतिफळ माेठे आहे.
Hebrews 10:38 in Marathi 38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 Peter 1:8 in Marathi 8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.
1 Peter 2:5 in Marathi 5 तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आध्यात्मिक मंदिर असे,रचले जात आहा देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहा.
Revelation 2:18 in Marathi 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.
Revelation 2:25 in Marathi 25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला बळकटपणे धरून राहा
Revelation 3:11 in Marathi 11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये.