Hebrews 2:3 in Marathi 3 तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
Other Translations King James Version (KJV) How shall we escape, if we neglect so great salvation; which at the first began to be spoken by the Lord, and was confirmed unto us by them that heard him;
American Standard Version (ASV) how shall we escape, if we neglect so great a salvation? which having at the first been spoken through the Lord, was confirmed unto us by them that heard;
Bible in Basic English (BBE) What will come on us, if we do not give our minds to such a great salvation? a salvation of which our fathers first had knowledge through the words of the Lord, and which was made certain to us by those to whom his words came;
Darby English Bible (DBY) how shall *we* escape if we have been negligent of so great salvation, which, having had its commencement in being spoken [of] by the Lord, has been confirmed to us by those who have heard;
World English Bible (WEB) how will we escape if we neglect so great a salvation-- which at the first having been spoken through the Lord, was confirmed to us by those who heard;
Young's Literal Translation (YLT) how shall we escape, having neglected so great salvation? which a beginning receiving -- to be spoken through the Lord -- by those having heard was confirmed to us,
Cross Reference Matthew 4:17 in Marathi 17 त्यावेळेपासून येशू घोषणा करू लागला व म्हणू लागला की, “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Matthew 23:33 in Marathi 33 “तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात!. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल?
Mark 1:14 in Marathi 14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालीलास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
Mark 16:15 in Marathi 15 तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
Luke 1:2 in Marathi 2 जे सुरुवातीपासून त्याचे प्रत्यक्ष साक्षी आणि त्या वचनाचे सेवक झाले, त्यांनीच आम्हाला ह्या गोष्टी कळविल्या .
Luke 1:69 in Marathi 69 त्याने आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आमच्या साठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
Luke 24:19 in Marathi 19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 15:27 in Marathi 27 आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहा म्हणून तुम्हीही साक्ष द्याल
Acts 1:22 in Marathi 22 म्हणजे तो आपणांमध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरूत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Acts 4:12 in Marathi 12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही,कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
Acts 10:40 in Marathi 40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत केले! देवाने येशूला लोकांना स्पष्ट पाहू दिले.
Romans 2:3 in Marathi 3 तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या, आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे मनुष्या, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यात सुटशील असे मानतोस काय?
1 Thessalonians 5:3 in Marathi 3 “शांती आहे, सुरक्षीतता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.
1 Timothy 1:15 in Marathi 15 ``ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की , ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयला जगात आला, आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
Hebrews 4:1 in Marathi 1 म्हणून देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
Hebrews 10:28 in Marathi 28 जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो.
Hebrews 12:25 in Marathi 25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरवले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?
1 Peter 4:17 in Marathi 17 कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ काळ आता आला आहे; आणि प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
Revelation 6:16 in Marathi 16 आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोंकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा.
Revelation 7:10 in Marathi 10 ते मोठ्याने आेरडून म्हणत होते राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.