Hebrews 2:10 in Marathi 10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने त्याला त्याच्या दुःखसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
Other Translations King James Version (KJV) For it became him, for whom are all things, and by whom are all things, in bringing many sons unto glory, to make the captain of their salvation perfect through sufferings.
American Standard Version (ASV) For it became him, for whom are all things, and through whom are all things, in bringing many sons unto glory, to make the author of their salvation perfect through sufferings.
Bible in Basic English (BBE) Because it was right for him, for whom and through whom all things have being, in guiding his sons to glory, to make the captain of their salvation complete through pain.
Darby English Bible (DBY) For it became him, for whom [are] all things, and by whom [are] all things, in bringing many sons to glory, to make perfect the leader of their salvation through sufferings.
World English Bible (WEB) For it became him, for whom are all things, and through whom are all things, in bringing many children to glory, to make the author of their salvation perfect through sufferings.
Young's Literal Translation (YLT) For it was becoming to Him, because of whom `are' the all things, and through whom `are' the all things, many sons to glory bringing, the author of their salvation through sufferings to make perfect,
Cross Reference Luke 2:14 in Marathi 14 परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.
Luke 13:32 in Marathi 32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
Luke 24:46 in Marathi 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे,
John 11:52 in Marathi 52 आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.
John 19:30 in Marathi 30 येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
Acts 3:15 in Marathi 15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Romans 3:25 in Marathi 25 त्याला देवाने ह्यासाठी पुढे ठेवले की, विश्वासाद्वारे, त्याच्या रक्ताकडून प्रायश्चित्त व्हावे, आणि त्याने आपले नीतिमत्व प्रकट करावे; कारण देवाच्या सहनशीलपणात, मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे
Romans 8:14 in Marathi 14 कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवितो ते देवाचे पुत्र आहेत.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 9:25 in Marathi 25 कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
Romans 11:36 in Marathi 36 कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
1 Corinthians 2:7 in Marathi 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
1 Corinthians 8:6 in Marathi 6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
2 Corinthians 3:18 in Marathi 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्व जण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
2 Corinthians 4:17 in Marathi 17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
2 Corinthians 5:18 in Marathi 18 हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली;
2 Corinthians 6:18 in Marathi 18 आणि मी तुम्हाला पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो.’
Galatians 3:26 in Marathi 26 पण ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहा.
Ephesians 1:5 in Marathi 5 “देवाच्या प्रीतीच्या योजनेनुसार त्याच्या स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली. त्याने हे यासाठी केले कारण त्याची जी इच्छा होती त्यात तो आनंदित होता.”
Ephesians 2:7 in Marathi 7 “देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी.
Ephesians 3:10 in Marathi 10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे बहुत प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. “
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
Colossians 3:4 in Marathi 4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
2 Timothy 2:10 in Marathi 10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.
Hebrews 5:8 in Marathi 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
Hebrews 6:20 in Marathi 20 तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी प्रमुख याजक झाला आहे.
Hebrews 7:26 in Marathi 26 म्हणून अगदी असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुध्द आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
Hebrews 7:28 in Marathi 28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे “पुत्र'' हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.
Hebrews 12:2 in Marathi 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
1 Peter 1:12 in Marathi 12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
1 John 3:1 in Marathi 1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच! ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले नाही.
Revelation 4:11 in Marathi 11 “हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस. तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न करण्यात आले. ”
Revelation 7:9 in Marathi 9 या गोष्टीनंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. पांढरे झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या हाेत्या.