Hebrews 11:6 in Marathi 6 पण विश्वासाशिवाय त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
Other Translations King James Version (KJV) But without faith it is impossible to please him: for he that cometh to God must believe that he is, and that he is a rewarder of them that diligently seek him.
American Standard Version (ASV) And without faith it is impossible to be well-pleasing `unto him'; for he that cometh to God must believe that he is, and `that' he is a rewarder of them that seek after him.
Bible in Basic English (BBE) And without faith it is not possible to be well-pleasing to him, for it is necessary for anyone who comes to God to have the belief that God is, and that he is a rewarder of all those who make a serious search for him.
Darby English Bible (DBY) But without faith [it is] impossible to please [him]. For he that draws near to God must believe that he is, and [that] he is a rewarder of them who seek him out.
World English Bible (WEB) Without faith it is impossible to be well pleasing to him, for he who comes to God must believe that he exists, and that he is a rewarder of those who seek him.
Young's Literal Translation (YLT) and apart from faith it is impossible to please well, for it behoveth him who is coming to God to believe that He is, and to those seeking Him He becometh a rewarder.
Cross Reference Matthew 5:12 in Marathi 12 आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्याचा त्यांनी तसाच छळ केला.
Matthew 6:1 in Marathi 1 “लोकांनी आपली न्यायीपण पहावे म्हणून जर तुम्ही सत्कृत्ये करणार असाल तर जपा तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
Matthew 6:5 in Marathi 5 “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकास दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 6:33 in Marathi 33 तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर यावरील सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील.
Matthew 10:41 in Marathi 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि नितीमानाला नितीमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नितीमानाचे प्रतिफळ मिळेल
Mark 16:17 in Marathi 17 परंतु जो विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भुते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.’
Luke 6:35 in Marathi 35 परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रेम करा, व त्यांचे बरे करा, आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
Luke 12:31 in Marathi 31 त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.
John 3:18 in Marathi 18 जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
John 8:24 in Marathi 24 मी म्हणून तुम्हाला सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
Romans 10:14 in Marathi 14 मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
Galatians 5:6 in Marathi 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
Hebrews 3:12 in Marathi 12 बंधुजनहो , जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये म्हणून जपा.
Hebrews 3:18 in Marathi 18 कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
Hebrews 4:2 in Marathi 2 कारण आम्हाला सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
Hebrews 4:6 in Marathi 6 ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
Hebrews 7:19 in Marathi 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हाला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
Hebrews 11:26 in Marathi 26 आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण तो प्रतिफळाकडे अचल दृष्टीने पाहत होता.
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
Revelation 21:8 in Marathi 8 पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय. ”