Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
Other Translations King James Version (KJV) Hath in these last days spoken unto us by his Son, whom he hath appointed heir of all things, by whom also he made the worlds;
American Standard Version (ASV) hath at the end of these days spoken unto us in `his' Son, whom he appointed heir of all things, through whom also he made the worlds;
Bible in Basic English (BBE) But now, at the end of these days, it has come to us through his Son, to whom he has given all things for a heritage, and through whom he made the order of the generations;
Darby English Bible (DBY) at the end of these days has spoken to us in [the person of the] Son, whom he has established heir of all things, by whom also he made the worlds;
World English Bible (WEB) has at the end of these days spoken to us by his Son, whom he appointed heir of all things, through whom also he made the worlds.
Young's Literal Translation (YLT) in these last days did speak to us in a Son, whom He appointed heir of all things, through whom also He did make the ages;
Cross Reference Matthew 3:17 in Marathi 17 आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.
Matthew 17:5 in Marathi 5 तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Matthew 21:38 in Marathi 38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
Matthew 26:63 in Marathi 63 पण येशूने काहीच उत्तर दिले नाही.परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
Mark 1:1 in Marathi 1 देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
Mark 12:6 in Marathi 6 धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठवले. तो म्हणाला, “खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.” तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठवले.
John 1:3 in Marathi 3 सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावांचून झाले नाही.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 3:25 in Marathi 25 मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुध्दीकरणाविषयी वादविवाद झाला.
John 13:3 in Marathi 3 येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते, आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
John 15:15 in Marathi 15 मी तुम्हाला आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला कळत नाही; पण मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हाला कळवल्या आहेत.
John 16:15 in Marathi 15 जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालों की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवील.
John 17:2 in Marathi 2 जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.
Acts 2:17 in Marathi 17 देव म्हणतो, शेवटल्या दिवसात 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरूणांस दृष्टांन्त होतील, व तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील;
Acts 10:36 in Marathi 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताव्दारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!
Romans 1:4 in Marathi 4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे, मेलेल्यातून पुन्हा उठण्याने, तो सामर्थ्याने, देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
1 Corinthians 8:6 in Marathi 6 परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व काही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
1 Corinthians 15:25 in Marathi 25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
Ephesians 1:10 in Marathi 10 जेणेकरून त्याची ही योजना पूर्ण होेण्यासाठी काळाची पूर्तता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणिल.
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Ephesians 3:9 in Marathi 9 आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादिकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकास मी प्रकट करावे.
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
Hebrews 1:5 in Marathi 5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन ? व तो माझा पुत्र होईल ?
Hebrews 1:8 in Marathi 8 पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे अाहे; आणि तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे.
Hebrews 2:3 in Marathi 3 तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
Hebrews 2:8 in Marathi 8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
Hebrews 5:8 in Marathi 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
Hebrews 7:3 in Marathi 3 मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्युची नोंद आढळत नाही. देवपुत्रा प्रमाणे तो मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे
Hebrews 9:26 in Marathi 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे
Hebrews 11:3 in Marathi 3 विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
2 Peter 3:3 in Marathi 3 प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील,
Jude 1:18 in Marathi 18 त्यांनी तुम्हाला म्हटले होते की, ‘शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील’.