Galatians 3:22 in Marathi 22 तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यांत उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यांत यावे.
Other Translations King James Version (KJV) But the scripture hath concluded all under sin, that the promise by faith of Jesus Christ might be given to them that believe.
American Standard Version (ASV) But the scriptures shut up all things under sin, that the promise by faith in Jesus Christ might be given to them that believe.
Bible in Basic English (BBE) However, the holy Writings have put all things under sin, so that that for which God gave the undertaking, based on faith in Jesus Christ, might be given to those who have such faith.
Darby English Bible (DBY) but the scripture has shut up all things under sin, that the promise, on the principle of faith of Jesus Christ, should be given to those that believe.
World English Bible (WEB) But the Scriptures shut up all things under sin, that the promise by faith in Jesus Christ might be given to those who believe.
Young's Literal Translation (YLT) but the Writing did shut up the whole under sin, that the promise by faith of Jesus Christ may be given to those believing.
Cross Reference Mark 16:16 in Marathi 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
John 3:15 in Marathi 15 ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
John 3:36 in Marathi 36 जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे एेकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 6:40 in Marathi 40 माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”
John 11:25 in Marathi 25 येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
John 12:46 in Marathi 46 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
John 20:31 in Marathi 31 पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.
Acts 16:31 in Marathi 31 ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.
Romans 3:9 in Marathi 9 मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही. कारण सगळे, यहूदी व ग्रीक, पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.
Romans 3:23 in Marathi 23 कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले ;
Romans 4:11 in Marathi 11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे.
Romans 5:12 in Marathi 12 म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.
Romans 5:20 in Marathi 20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
Romans 10:9 in Marathi 9 कारण, येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
Romans 11:32 in Marathi 32 कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.
Galatians 3:8 in Marathi 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल’.
Galatians 3:14 in Marathi 14 ह्यांत उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
Galatians 3:17 in Marathi 17 आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशे तीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.
Galatians 3:23 in Marathi 23 हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्या अगोदर आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते.
Galatians 3:29 in Marathi 29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहा.
2 Timothy 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
Hebrews 6:13 in Marathi 13 जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली.
Hebrews 9:15 in Marathi 15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार सर्वकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावतो, त्यांच्याकरता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 Peter 3:13 in Marathi 13 तरी ज्यामध्ये नीतिमत्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.
1 John 2:25 in Marathi 25 आणि देवाने आम्हाला जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.
1 John 3:23 in Marathi 23 तो आम्हाला अशी आज्ञा आहे की,त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
1 John 5:11 in Marathi 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.