Galatians 3:14 in Marathi 14 ह्यांत उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
Other Translations King James Version (KJV) That the blessing of Abraham might come on the Gentiles through Jesus Christ; that we might receive the promise of the Spirit through faith.
American Standard Version (ASV) that upon the Gentiles might come the blessing of Abraham in Christ Jesus; that we might receive the promise of the Spirit through faith.
Bible in Basic English (BBE) So that on the Gentiles might come the blessing of Abraham in Christ Jesus; in order that we through faith might have the Spirit which God had undertaken to give.
Darby English Bible (DBY) that the blessing of Abraham might come to the nations in Christ Jesus, that we might receive the promise of the Spirit through faith.
World English Bible (WEB) that the blessing of Abraham might come on the Gentiles through Christ Jesus; that we might receive the promise of the Spirit through faith.
Young's Literal Translation (YLT) that to the nations the blessing of Abraham may come in Christ Jesus, that the promise of the Spirit we may receive through the faith.
Cross Reference Luke 2:10 in Marathi 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हास सांगतो.
Luke 11:13 in Marathi 13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देेण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
Luke 24:49 in Marathi 49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा,
John 7:39 in Marathi 39 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
Acts 1:4 in Marathi 4 तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा.
Acts 2:33 in Marathi 33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Acts 3:25 in Marathi 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
Acts 4:12 in Marathi 12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही,कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
Acts 5:32 in Marathi 32 ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.
Acts 10:45 in Marathi 45 यहूदी सुंता झालेले विश्वासाणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले. यहूदी नसलेल्या लोकांवरसुध्दा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.
Acts 11:15 in Marathi 15 त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
Romans 4:3 in Marathi 3 कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले.
Romans 8:9 in Marathi 9 पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहा. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.
Romans 8:26 in Marathi 26 त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
Romans 10:9 in Marathi 9 कारण, येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
1 Corinthians 12:13 in Marathi 13 कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच आत्म्याने प्यायला दिले.
2 Corinthians 1:22 in Marathi 22 तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला आहे.
Galatians 3:2 in Marathi 2 तुम्हाला जो आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी की, विश्वासापूर्वक ऐकल्यामुळे मिळाला,इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे.
Galatians 3:5 in Marathi 5 म्हणून जो तुम्हाला आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, विश्वासपूर्वक ऐकल्यामुळे?
Galatians 3:16 in Marathi 16 आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
Galatians 3:28 in Marathi 28 यहूदी किंवा हेल्लेणी, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही; कारण ख्रिस्त येशूत तुम्ही सर्वजण एकच आहा.
Galatians 4:6 in Marathi 6 आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने‘अब्बा बापा,’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; ‘
Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
Ephesians 2:18 in Marathi 18 “ कारण येशूच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्यात पित्याजवळ प्रवेश होतो.
Ephesians 2:22 in Marathi 22 त्याच्यामध्ये तुम्हीसुध्दा इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
Ephesians 3:16 in Marathi 16 त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हाला असे द्यावे, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. “
Ephesians 4:30 in Marathi 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.
1 Timothy 2:4 in Marathi 4 त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
Jude 1:19 in Marathi 19 हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत.