Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Other Translations King James Version (KJV) O foolish Galatians, who hath bewitched you, that ye should not obey the truth, before whose eyes Jesus Christ hath been evidently set forth, crucified among you?
American Standard Version (ASV) O foolish Galatians, who did bewitch you, before whose eyes Jesus Christ was openly set forth crucified?
Bible in Basic English (BBE) O foolish Galatians, by what strange powers have you been tricked, to whom it was made clear that Jesus Christ was put to death on the cross?
Darby English Bible (DBY) O senseless Galatians, who has bewitched you; to whom, as before your very eyes, Jesus Christ has been portrayed, crucified [among you]?
World English Bible (WEB) Foolish Galatians, who has bewitched you not to obey the truth, before whose eyes Jesus Christ was openly set forth among you as crucified?
Young's Literal Translation (YLT) O thoughtless Galatians, who did bewitch you, not to obey the truth -- before whose eyes Jesus Christ was described before among you crucified?
Cross Reference Matthew 7:26 in Marathi 26 “जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Luke 24:25 in Marathi 25 मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
Acts 6:7 in Marathi 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली;याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
Acts 8:9 in Marathi 9 शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे शोमरोनी लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे
Romans 2:8 in Marathi 8 परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,
Romans 6:17 in Marathi 17 पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात,
Romans 10:16 in Marathi 16 पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
1 Corinthians 1:23 in Marathi 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे.
1 Corinthians 2:2 in Marathi 2 कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे.
1 Corinthians 11:26 in Marathi 26 कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
2 Corinthians 10:5 in Marathi 5 तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूध्द उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
Galatians 1:6 in Marathi 6 मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या सुवार्तेकडे वळला आहा.
Galatians 2:14 in Marathi 14 पण मी जेव्हा बघितले की, सुवार्तेच्या सत्याप्रमाणे नीट चालत नाहीत, असे मी पाहिले, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, ‘तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?’
Galatians 3:3 in Marathi 3 तुम्ही इतके बुध्दीहीन आहा काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहा काय?
Galatians 4:9 in Marathi 9 पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना, किंवा देव तुम्हाला ओळखीत असताना, तुम्ही त्या दुर्बळ, व निसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता?
Galatians 5:7 in Marathi 7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Ephesians 5:15 in Marathi 15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
2 Thessalonians 1:8 in Marathi 8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
1 Timothy 6:4 in Marathi 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 11:8 in Marathi 8 विश्वासाने, अब्राहामाने, त्याला जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्याला बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्याला माहीत नसताना तो निघाला.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 4:17 in Marathi 17 कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ काळ आता आला आहे; आणि प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
2 Peter 2:18 in Marathi 18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.
Revelation 2:20 in Marathi 20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
Revelation 13:13 in Marathi 13 तो मोठी चिन्हे करतो; आणि लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,
Revelation 18:3 in Marathi 3 कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत; आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या अति संपत्तिने व एेषाेआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत. ’