Galatians 1:1 in Marathi 1 गलतीयातील मंडळ्यांनाः मी मनुष्यांकडून किंवा मनुष्यांद्वारेही नाही, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले, त्या देवपिता ह्याच्याद्वारे प्रेषित पौल
Other Translations King James Version (KJV) Paul, an apostle, (not of men, neither by man, but by Jesus Christ, and God the Father, who raised him from the dead;)
American Standard Version (ASV) Paul, an apostle (not from men, neither through man, but through Jesus Christ, and God the Father, who raised him from the dead),
Bible in Basic English (BBE) Paul, an Apostle (not from men, and not through man, but through Jesus Christ, and God the Father, who made him come back from the dead),
Darby English Bible (DBY) Paul, apostle, not from men nor through man, but through Jesus Christ, and God [the] Father who raised him from among [the] dead,
World English Bible (WEB) Paul, an apostle (not from men, neither through man, but through Jesus Christ, and God the Father, who raised him from the dead),
Young's Literal Translation (YLT) Paul, an apostle -- not from men, nor through man, but through Jesus Christ, and God the Father, who did raise him out of the dead --
Cross Reference Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 10:30 in Marathi 30 मी आणि पिता एक आहो.”
John 20:21 in Marathi 21 तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हाला पाठवतो.”
Acts 1:16 in Marathi 16 बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
Acts 2:24 in Marathi 24 त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले ,कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
Acts 3:15 in Marathi 15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.
Acts 9:6 in Marathi 6 आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणी तरी सांगेल.”
Acts 9:15 in Marathi 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
Acts 13:2 in Marathi 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
Acts 22:10 in Marathi 10 मग मी म्हणालो , प्रभूजी मी काय करावे ?प्रभूने मला म्हटले,उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.
Acts 22:14 in Marathi 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Acts 26:16 in Marathi 16 पण ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 1:4 in Marathi 4 व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे, मेलेल्यातून पुन्हा उठण्याने, तो सामर्थ्याने, देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
Romans 4:24 in Marathi 24 पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मेलेल्यातून उठवले, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला, तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे .
Romans 10:9 in Marathi 9 कारण, येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि, देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
Romans 14:9 in Marathi 9 कारण ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
1 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
2 Corinthians 3:1 in Marathi 1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहो काय? किंवा आम्हाला, दुसर्यांप्रमाणे, तुमच्याकरता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?
Galatians 1:11 in Marathi 11 कारण, बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो की, मी ज्या सुवार्तेची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही.
Galatians 1:17 in Marathi 17 आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर न जाता, पण मी लगेच अरबस्तानात निघून गेलो व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
Ephesians 1:19 in Marathi 19 “आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आेळखून घ्यावे .
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
2 Timothy 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
Titus 1:3 in Marathi 3 त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 1:21 in Marathi 21 आणि त्याच्या द्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण, देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्याला मृतांतून उठवून गौरव दिला.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो