Ephesians 6:18 in Marathi 18 प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
Other Translations King James Version (KJV) Praying always with all prayer and supplication in the Spirit, and watching thereunto with all perseverance and supplication for all saints;
American Standard Version (ASV) with all prayer and supplication praying at all seasons in the Spirit, and watching thereunto in all perseverance and supplication for all the saints,
Bible in Basic English (BBE) With prayers and deep desires, making requests at all times in the Spirit, and keeping watch, with strong purpose, in prayer for all the saints,
Darby English Bible (DBY) praying at all seasons, with all prayer and supplication in [the] Spirit, and watching unto this very thing with all perseverance and supplication for all the saints;
World English Bible (WEB) with all prayer and requests, praying at all times in the Spirit, and being watchful to this end in all perseverance and requests for all the saints:
Young's Literal Translation (YLT) through all prayer and supplication praying at all times in the Spirit, and in regard to this same, watching in all perseverance and supplication for all the saints --
Cross Reference Matthew 15:25 in Marathi 25 मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
Matthew 26:41 in Marathi 41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे”.
Mark 13:33 in Marathi 33 सावध असा,प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.
Mark 14:38 in Marathi 38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
Luke 3:26 in Marathi 26 नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
Luke 3:37 in Marathi 37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.
Luke 11:5 in Marathi 5 मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,
Luke 18:1 in Marathi 1 निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला.
Luke 21:36 in Marathi 36 यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.
Luke 22:46 in Marathi 46 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा, आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
Acts 1:14 in Marathi 14 हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
Acts 6:4 in Marathi 4 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
Acts 10:2 in Marathi 2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
Acts 12:5 in Marathi 5 म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
Romans 8:15 in Marathi 15 कारण तुम्हाला, पुन्हा भय धरण्यास, दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे, ‘अब्बा, बापा,’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे.
Romans 8:26 in Marathi 26 त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
Romans 12:12 in Marathi 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
Galatians 4:6 in Marathi 6 आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने‘अब्बा बापा,’ अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; ‘
Ephesians 1:16 in Marathi 16 मी ही तुमच्यासाठी देवाचे आभार मानण्याचे थांबविले नाही आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो.
Ephesians 2:22 in Marathi 22 त्याच्यामध्ये तुम्हीसुध्दा इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 3:18 in Marathi 18 “ “यासाठी की,जे पवित्र जन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
Ephesians 6:19 in Marathi 19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करा,जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
Philippians 1:4 in Marathi 4 माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; कारण, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची सुवार्तेच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.
Philippians 4:6 in Marathi 6 कशाविषयीचीहि काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
Colossians 1:4 in Marathi 4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी, आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
Colossians 4:2 in Marathi 2 प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा.
1 Thessalonians 5:17 in Marathi 17 निरंतर प्रार्थना करा.
1 Timothy 2:1 in Marathi 1 तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
2 Timothy 1:3 in Marathi 3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुध्द विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
Philemon 1:5 in Marathi 5 कारण प्रभू येशूवर आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे व तुझा जो विश्वास आहे, त्यांविषयी मी एेकतो.
Hebrews 5:7 in Marathi 7 येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.
1 Peter 4:7 in Marathi 7 पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे; म्हणून समंजस मनाचे व्हा, आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,