Ephesians 3:9 in Marathi 9 आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादिकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकास मी प्रकट करावे.
Other Translations King James Version (KJV) And to make all men see what is the fellowship of the mystery, which from the beginning of the world hath been hid in God, who created all things by Jesus Christ:
American Standard Version (ASV) and to make all men see what is the dispensation of the mystery which for ages hath been hid in God who created all things;
Bible in Basic English (BBE) And make all men see what is the ordering of the secret which from the first has been kept in God who made all things;
Darby English Bible (DBY) and to enlighten all [with the knowledge of] what is the administration of the mystery hidden throughout the ages in God, who has created all things,
World English Bible (WEB) and to make all men see what is the administration{TR reads "fellowship" instead of "administration"} of the mystery which for ages has been hidden in God, who created all things through Jesus Christ;
Young's Literal Translation (YLT) and to cause all to see what `is' the fellowship of the secret that hath been hid from the ages in God, who the all things did create by Jesus Christ,
Cross Reference Matthew 10:27 in Marathi 27 जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा.
Matthew 13:35 in Marathi 35 ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन’.
Matthew 25:34 in Marathi 34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.
Matthew 28:19 in Marathi 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Mark 16:15 in Marathi 15 तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 5:17 in Marathi 17 येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अाजपर्यंत काम करीत आहे, आणि मीही काम करीत आहे.”
John 5:19 in Marathi 19 ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून कांहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.
John 10:30 in Marathi 30 मी आणि पिता एक आहो.”
Acts 15:18 in Marathi 18 हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो ,
1 Corinthians 2:7 in Marathi 7 तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 3:3 in Marathi 3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे मला सत्याचे रहस्य कळवले गेले मी ते यापुर्वी थोडक्यात लिहिले होते.
Colossians 1:16 in Marathi 16 कारण, स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्या द्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 1:26 in Marathi 26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता, त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 4:17 in Marathi 17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी. आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
Hebrews 1:2 in Marathi 2 परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
Hebrews 3:3 in Marathi 3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
Revelation 4:11 in Marathi 11 “हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस. तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न करण्यात आले. ”
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 14:6 in Marathi 6 आणि मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणार्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणार्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती.
Revelation 17:8 in Marathi 8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.