Ephesians 1:3 in Marathi 3 स्वर्गीय स्थानातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाला व पित्याला धन्यवाद असोत.
Other Translations King James Version (KJV) Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who hath blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ:
American Standard Version (ASV) Blessed `be' the God and Father of our Lord Jesus Christ, who hath blessed us with every spiritual blessing in the heavenly `places' in Christ:
Bible in Basic English (BBE) Praise be to the God and Father of our Lord Jesus Christ, who has given us every blessing of the Spirit in the heavens in Christ:
Darby English Bible (DBY) Blessed [be] the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with every spiritual blessing in the heavenlies in Christ;
World English Bible (WEB) Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with every spiritual blessing in the heavenly places in Christ;
Young's Literal Translation (YLT) Blessed `is' the God and Father of our Lord Jesus Christ, who did bless us in every spiritual blessing in the heavenly places in Christ,
Cross Reference Luke 2:28 in Marathi 28 तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले,
John 10:29 in Marathi 29 पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे, आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही .
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 15:2 in Marathi 2 माझ्यांतील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
Romans 12:5 in Marathi 5 तसे आपण पुष्कळ असून, ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण, एक , एकमेकांचे अवयव आहोत.
Romans 15:6 in Marathi 6 म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 12:12 in Marathi 12 कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात, आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
2 Corinthians 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो.
2 Corinthians 5:17 in Marathi 17 म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
2 Corinthians 11:31 in Marathi 31 देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.
Galatians 3:9 in Marathi 9 तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.
Ephesians 1:10 in Marathi 10 जेणेकरून त्याची ही योजना पूर्ण होेण्यासाठी काळाची पूर्तता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणिल.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Ephesians 2:6 in Marathi 6 “आणि आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या आसनावर बसविले.
Ephesians 3:10 in Marathi 10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे बहुत प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. “
Ephesians 6:12 in Marathi 12 कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुध्द, अधिकाऱ्याविरुध्द, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुध्द आहे.
Philippians 2:11 in Marathi 11 आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
Hebrews 8:5 in Marathi 5 ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचने नुसार प्रत्येक गोष्ट कर.”
Hebrews 9:23 in Marathi 23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुध्द करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुध्द केल्या जातात.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
Revelation 4:9 in Marathi 9 जो सिंहासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते ,
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.