Ephesians 1:18 in Marathi 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे,
Other Translations King James Version (KJV) The eyes of your understanding being enlightened; that ye may know what is the hope of his calling, and what the riches of the glory of his inheritance in the saints,
American Standard Version (ASV) having the eyes of your heart enlightened, that ye may know what is the hope of his calling, what the riches of the glory of his inheritance in the saints,
Bible in Basic English (BBE) And that having the eyes of your heart full of light, you may have knowledge of what is the hope of his purpose, what is the wealth of the glory of his heritage in the saints,
Darby English Bible (DBY) being enlightened in the eyes of your heart, so that ye should know what is the hope of his calling, [and] what the riches of the glory of his inheritance in the saints,
World English Bible (WEB) having the eyes of your hearts{TR reads "understanding" instead of "hearts"} enlightened, that you may know what is the hope of his calling, and what are the riches of the glory of his inheritance in the saints,
Young's Literal Translation (YLT) the eyes of your understanding being enlightened, for your knowing what is the hope of His calling, and what the riches of the glory of His inheritance in the saints,
Cross Reference Matthew 13:15 in Marathi 15 कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यानी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि पुन्हा मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.
Luke 24:45 in Marathi 45 नंतर शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
Acts 16:14 in Marathi 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती;ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची भक्ति करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले;तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 5:4 in Marathi 4 आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
Romans 8:24 in Marathi 24 कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशा ही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
Galatians 5:5 in Marathi 5 कारण आपण आत्म्याच्या द्वारे,विश्वासाने, नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो.
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Ephesians 1:11 in Marathi 11 ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो
Ephesians 2:12 in Marathi 12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 3:16 in Marathi 16 त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हाला असे द्यावे, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. “
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
Ephesians 4:4 in Marathi 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास पाचारण केले आहे.
Ephesians 5:8 in Marathi 8 कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
Philippians 3:14 in Marathi 14 ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
Colossians 1:5 in Marathi 5 जी आशा तुमच्यासाठी आकाशात ठेवली आहे ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 3:15 in Marathi 15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 5:8 in Marathi 8 परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे;विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
2 Thessalonians 1:11 in Marathi 11 ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या ह्या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 6:12 in Marathi 12 विश्वासा संबंधी चांगले युध्द कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Titus 3:7 in Marathi 7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
Hebrews 6:4 in Marathi 4 कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत,
Hebrews 10:32 in Marathi 32 ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
1 John 3:1 in Marathi 1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच! ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले नाही.