Ephesians 1:13 in Marathi 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुध्दा सत्याचे वचन आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
Other Translations King James Version (KJV) In whom ye also trusted, after that ye heard the word of truth, the gospel of your salvation: in whom also after that ye believed, ye were sealed with that holy Spirit of promise,
American Standard Version (ASV) in whom ye also, having heard the word of the truth, the gospel of your salvation,-- in whom, having also believed, ye were sealed with the Holy Spirit of promise,
Bible in Basic English (BBE) In whom you, having been given the true word, the good news of your salvation, and through your faith in him, were given the sign of the Holy Spirit of hope,
Darby English Bible (DBY) in whom *ye* also [have trusted], having heard the word of the truth, the glad tidings of your salvation; in whom also, having believed, ye have been sealed with the Holy Spirit of promise,
World English Bible (WEB) in whom you also, having heard the word of the truth, the Gospel of your salvation,--in whom, having also believed, you were sealed with the Holy Spirit of promise,
Young's Literal Translation (YLT) in whom ye also, having heard the word of the truth -- the good news of your salvation -- in whom also having believed, ye were sealed with the Holy Spirit of the promise,
Cross Reference Mark 16:15 in Marathi 15 तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
Luke 11:13 in Marathi 13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देेण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
Luke 24:49 in Marathi 49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा,
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
John 14:16 in Marathi 16 मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ राहावे.
John 14:26 in Marathi 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:7 in Marathi 7 तरीपण मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन;
Acts 1:4 in Marathi 4 तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगी विषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा.
Acts 2:16 in Marathi 16 परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे.
Acts 2:33 in Marathi 33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
Acts 13:26 in Marathi 26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली.
Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Romans 4:11 in Marathi 11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे.
Romans 6:17 in Marathi 17 पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात,
Romans 10:14 in Marathi 14 मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
2 Corinthians 1:22 in Marathi 22 तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला आहे.
2 Corinthians 6:7 in Marathi 7 सत्याच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून,
Galatians 3:14 in Marathi 14 ह्यांत उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
Ephesians 2:11 in Marathi 11 म्हणून आठवण करा, एके काळी तुम्ही देहाने परराष्ट्रीय होता,आणि ज्यांची देहाची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.
Ephesians 4:21 in Marathi 21 “ जर तुम्ही त्याच्याबद्दल एेकले असेल आणि त्याकडून येशूच्याठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल.
Ephesians 4:30 in Marathi 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.
Colossians 1:4 in Marathi 4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी, आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
Colossians 1:21 in Marathi 21 आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
1 Thessalonians 2:13 in Marathi 13 ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
2 Timothy 2:15 in Marathi 15 देवाला पटलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
2 Timothy 3:15 in Marathi 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Hebrews 2:3 in Marathi 3 तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
James 1:18 in Marathi 18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
1 Peter 2:10 in Marathi 10 ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, पण आता देवाचे लोक आहा; तुमच्यावर दया केली नव्हती, पण आता दया केली गेली आहे.
Revelation 7:2 in Marathi 2 मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने आेरडून म्हणाला,