Colossians 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंत:करणात स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
Other Translations King James Version (KJV) Let the word of Christ dwell in you richly in all wisdom; teaching and admonishing one another in psalms and hymns and spiritual songs, singing with grace in your hearts to the Lord.
American Standard Version (ASV) Let the word of Christ dwell in you richly; in all wisdom teaching and admonishing one another with psalms `and' hymns `and' spiritual songs, singing with grace in your hearts unto God.
Bible in Basic English (BBE) Let the word of Christ be in you in all wealth of wisdom; teaching and helping one another with songs of praise and holy words, making melody to God with grace in your hearts.
Darby English Bible (DBY) Let the word of the Christ dwell in you richly, in all wisdom teaching and admonishing one another, in psalms, hymns, spiritual songs, singing with grace in your hearts to God.
World English Bible (WEB) Let the word of Christ dwell in you richly; in all wisdom teaching and admonishing one another with psalms, hymns, and spiritual songs, singing with grace in your heart to the Lord.
Young's Literal Translation (YLT) Let the word of Christ dwell in you richly, in all wisdom, teaching and admonishing each other, in psalms, and hymns, and spiritual songs, in grace singing in your hearts to the Lord;
Cross Reference Matthew 26:30 in Marathi 30 मग त्यांनी एक गीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
Luke 2:51 in Marathi 51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंत:करणात जपून ठेवल्या.
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
John 15:7 in Marathi 7 तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.
Romans 10:17 in Marathi 17 तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
Romans 15:14 in Marathi 14 आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहा.
1 Corinthians 14:15 in Marathi 15 मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुध्दीनेही प्रार्थना करीन.
1 Corinthians 14:26 in Marathi 26 बंधूंनो मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकजण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास,कोणी प्रकटीकरण सांगण्यास,कोणी अन्य भाषेतून बोलण्यास, तर कोणी अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही मंडळीच्या उन्नतीसाठी असावे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 5:17 in Marathi 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
Ephesians 5:19 in Marathi 19 सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी त्याची स्तुती करा.एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात त्याची स्तुती करा.
Colossians 1:9 in Marathi 9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडू न देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुध्दी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
Colossians 1:28 in Marathi 28 आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्याला बोध करतो, आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
Colossians 4:6 in Marathi 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
1 Thessalonians 4:18 in Marathi 18 म्हणून तुम्ही ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
1 Thessalonians 5:11 in Marathi 11 म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहा.
2 Thessalonians 3:15 in Marathi 15 तरी त्याला शत्रु समजू नका, तर त्याला बंधु समजून त्याची कान उघडणी करा.
1 Timothy 6:17 in Marathi 17 या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
2 Timothy 3:15 in Marathi 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
Titus 3:6 in Marathi 6 आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला.
Hebrews 4:12 in Marathi 12 कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे ,आणि मनातील विचार व हेतू हयांची पारख करणारे असे आहे.
Hebrews 12:12 in Marathi 12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
James 1:5 in Marathi 5 म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे.म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो दोष न लावता सर्वास उदारपणे देतो;
James 3:17 in Marathi 17 पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुध्द, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
James 5:13 in Marathi 13 तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
1 John 2:14 in Marathi 14 बापांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण तुम्हाला पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हाला लिहिले, कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहिले, कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते, कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
1 John 2:24 in Marathi 24 तुमच्या विषयी जे म्हणावयाचे तर,जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून एेकले ते जर तुम्हामध्ये राहिले,तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
1 John 2:27 in Marathi 27 पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक -तो सत्य आहे, खोटा नाही - तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.
Revelation 14:3 in Marathi 3 ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी आणि वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; आणि पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.
Revelation 15:3 in Marathi 3 देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्याचे गीत गात होते. ‘सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”