Colossians 2:7 in Marathi 7 तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यात वाढत जा.
Other Translations King James Version (KJV) Rooted and built up in him, and stablished in the faith, as ye have been taught, abounding therein with thanksgiving.
American Standard Version (ASV) rooted and builded up in him, and established in your faith, even as ye were taught, abounding in thanksgiving.
Bible in Basic English (BBE) Rooted and based together in him, strong in the faith which the teaching gave you, giving praise to God at all times.
Darby English Bible (DBY) rooted and built up in him, and assured in the faith, even as ye have been taught, abounding in it with thanksgiving.
World English Bible (WEB) rooted and built up in him, and established in the faith, even as you were taught, abounding in it in thanksgiving.
Young's Literal Translation (YLT) being rooted and built up in him, and confirmed in the faith, as ye were taught -- abounding in it in thanksgiving.
Cross Reference Matthew 7:24 in Marathi 24 “जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या माणसासारखा आहे, अशा शहाण्या माणसाने आपले घर खडकावर बांधले.
Luke 6:48 in Marathi 48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते.
John 15:4 in Marathi 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याला आपल्याआपण फळ देतां येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.
Romans 11:17 in Marathi 17 आणि काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यांत कलम करून जोडला गेलास, आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास
1 Corinthians 3:9 in Marathi 9 कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात, व देवाची इमारत आहा.
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2 Corinthians 1:21 in Marathi 21 आता, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
Ephesians 2:20 in Marathi 20 “तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. “
Ephesians 3:17 in Marathi 17 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,
Ephesians 4:21 in Marathi 21 “ जर तुम्ही त्याच्याबद्दल एेकले असेल आणि त्याकडून येशूच्याठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल.
Ephesians 5:20 in Marathi 20 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
Colossians 1:12 in Marathi 12 आणि प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हाला पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
Colossians 3:17 in Marathi 17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल,ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
1 Thessalonians 5:18 in Marathi 18 प्रत्येक गोष्टींत उपकार माना. कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
2 Thessalonians 2:17 in Marathi 17 तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.
Hebrews 13:15 in Marathi 15 म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या आेठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण' त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.
1 Peter 2:4 in Marathi 4 मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
2 Peter 3:17 in Marathi 17 तर प्रियजनहो, तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सांपडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये हयासाठी जपून राहा.
Jude 1:12 in Marathi 12 हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत , ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत ते वार्यांबरोबर निघून जाणारे निर्जळ ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मेलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत,
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे