Colossians 2:2 in Marathi 2 ते परिश्रम ह्यांसाठी की,त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुध्दीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी;व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
Other Translations King James Version (KJV) That their hearts might be comforted, being knit together in love, and unto all riches of the full assurance of understanding, to the acknowledgement of the mystery of God, and of the Father, and of Christ;
American Standard Version (ASV) that their hearts may be comforted, they being knit together in love, and unto all riches of the full assurance of understanding, that they may know the mystery of God, `even' Christ,
Bible in Basic English (BBE) So that their hearts may be comforted, and that being joined together in love, they may come to the full wealth of the certain knowledge of the secret of God, even Christ,
Darby English Bible (DBY) to the end that their hearts may be encouraged, being united together in love, and unto all riches of the full assurance of understanding, to [the] full knowledge of the mystery of God;
World English Bible (WEB) that their hearts may be comforted, they being knit together in love, and gaining all riches of the full assurance of understanding, that they may know the mystery of God, both of the Father and of Christ,
Young's Literal Translation (YLT) that their hearts may be comforted, being united in love, and to all riches of the full assurance of the understanding, to the full knowledge of the secret of the God and Father, and of the Christ,
Cross Reference Matthew 11:25 in Marathi 25 मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुध्दीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या.
Matthew 11:27 in Marathi 27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Luke 10:21 in Marathi 21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला, आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुध्दीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे बरे वाटले ते तू केलेस.
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 5:17 in Marathi 17 येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अाजपर्यंत काम करीत आहे, आणि मीही काम करीत आहे.”
John 5:23 in Marathi 23 ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
John 6:69 in Marathi 69 आणि आम्ही विश्वास ठेवला आहे, आणि जाणतो की, तू देवाचा पवित्र पुरूष आपण आहा.”
John 10:30 in Marathi 30 मी आणि पिता एक आहो.”
John 10:38 in Marathi 38 पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे.”हे तुम्ही आेळखून घ्यावे.
John 14:9 in Marathi 9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
John 16:15 in Marathi 15 जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालों की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवील.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
Acts 4:32 in Marathi 32 तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता, आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ समाईक होते.
Romans 15:13 in Marathi 13 आणि आता आशेचा देव तुम्हाला तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
1 Corinthians 2:12 in Marathi 12 परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण अोळखून घ्यावे.
2 Corinthians 1:4 in Marathi 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की,ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात अाहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
Galatians 3:28 in Marathi 28 यहूदी किंवा हेल्लेणी, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही; कारण ख्रिस्त येशूत तुम्ही सर्वजण एकच आहा.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 3:9 in Marathi 9 आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादिकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकास मी प्रकट करावे.
Ephesians 6:22 in Marathi 22 मी त्याला त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हाला माझ्याविषयी कळावे, आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.
Philippians 2:1 in Marathi 1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता,काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
Philippians 3:8 in Marathi 8 इतकेच नाही,तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली. आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.
Colossians 1:9 in Marathi 9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडू न देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुध्दी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
Colossians 1:15 in Marathi 15 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Colossians 3:14 in Marathi 14 पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.
Colossians 4:8 in Marathi 8 मी त्याला त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे.
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
1 Thessalonians 3:2 in Marathi 2 आणि आम्ही आपला बंधु तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हाला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
1 Thessalonians 5:14 in Marathi 14 आता बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
Hebrews 6:11 in Marathi 11 पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
Hebrews 10:22 in Marathi 22 म्हणून आपण आपली मलीन विवेकबुद्धि शुध्द करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने असे खऱ्या अंतःकरणाने विश्र्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
2 Peter 1:3 in Marathi 3 ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या आेळखीच्या द्वारे, त्याच्या आपल्याला, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 3:19 in Marathi 19 यावरुन आपण आेळखू की आपण खरेपणाकडचे अाहो,व त्याच्या समोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ,
1 John 4:12 in Marathi 12 देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते.
1 John 5:7 in Marathi 7 आत्मा हा साक्ष देणारा आहे,कारण आत्मा सत्य आहे.