Colossians 2:18 in Marathi 18 लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्व:ताला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
Other Translations King James Version (KJV) Let no man beguile you of your reward in a voluntary humility and worshipping of angels, intruding into those things which he hath not seen, vainly puffed up by his fleshly mind,
American Standard Version (ASV) Let no man rob you of your prize by a voluntary humility and worshipping of the angels, dwelling in the things which he hath seen, vainly puffed up by his fleshly mind,
Bible in Basic English (BBE) Let no man take your reward from you by consciously making little of himself and giving worship to angels; having his thoughts fixed on the things which he has seen, being foolishly lifted up in his natural mind,
Darby English Bible (DBY) Let no one fraudulently deprive you of your prize, doing his own will in humility and worship of angels, entering into things which he has not seen, vainly puffed up by the mind of his flesh,
World English Bible (WEB) Let no one rob you of your prize by a voluntary humility and worshipping of the angels, dwelling in the things which he has not seen, vainly puffed up by his fleshly mind,
Young's Literal Translation (YLT) let no one beguile you of your prize, delighting in humble-mindedness and `in' worship of the messengers, intruding into the things he hath not seen, being vainly puffed up by the mind of his flesh,
Cross Reference Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Romans 1:25 in Marathi 25 त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले, आणि, निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.
Romans 8:6 in Marathi 6 कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
1 Corinthians 3:3 in Marathi 3 तुम्ही अजूनसुध्दा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय, व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?
1 Corinthians 4:18 in Marathi 18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काही जण गर्वाने फुगले आहेत.
1 Corinthians 8:1 in Marathi 1 आता, मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
1 Corinthians 8:5 in Marathi 5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हटलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील,
1 Corinthians 9:24 in Marathi 24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की,ते तुम्ही मिळवाल.
1 Corinthians 13:4 in Marathi 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
2 Corinthians 12:20 in Marathi 20 कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हाला आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध,स्वार्थी महत्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.
Galatians 5:19 in Marathi 19 आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः जारकर्म, अमंगळपणा, कामातुरपणा,
Ephesians 5:6 in Marathi 6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
Philippians 3:14 in Marathi 14 ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम.
Colossians 2:4 in Marathi 4 कोणी तुम्हाला लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
Colossians 2:8 in Marathi 8 तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हाला ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
Colossians 2:23 in Marathi 23 ह्या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.
1 Timothy 1:7 in Marathi 7 त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते, पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
James 3:14 in Marathi 14 पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका.
James 4:1 in Marathi 1 तुमच्यात लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
1 John 2:26 in Marathi 26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
2 John 1:7 in Marathi 7 कारण फसवणूक करणारी,म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत.फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.
Revelation 3:11 in Marathi 11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Revelation 22:8 in Marathi 8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.