Colossians 1:9 in Marathi 9 म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडू न देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की,तुम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुध्दी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
Other Translations King James Version (KJV) For this cause we also, since the day we heard it, do not cease to pray for you, and to desire that ye might be filled with the knowledge of his will in all wisdom and spiritual understanding;
American Standard Version (ASV) For this cause we also, since the day we heard `it', do not cease to pray and make request for you, that ye may be filled with the knowledge of his will in all spiritual wisdom and understanding,
Bible in Basic English (BBE) For this reason, we, from the day when we had word of it, keep on in prayer for you, that you may be full of the knowledge of his purpose, with all wisdom and experience of the Spirit,
Darby English Bible (DBY) For this reason *we* also, from the day we heard [of your faith and love], do not cease praying and asking for you, to the end that ye may be filled with the full knowledge of his will, in all wisdom and spiritual understanding,
World English Bible (WEB) For this cause, we also, since the day we heard this, don't cease praying and making requests for you, that you may be filled with the knowledge of his will in all spiritual wisdom and understanding,
Young's Literal Translation (YLT) Because of this, we also, from the day in which we heard, do not cease praying for you, and asking that ye may be filled with the full knowledge of His will in all wisdom and spiritual understanding,
Cross Reference John 7:17 in Marathi 17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगिल त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.
Acts 12:5 in Marathi 5 म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
Romans 1:8 in Marathi 8 मी तुमच्यातल्या सर्वांसाठी, प्रथम, येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो. कारण तुमच्या विश्वासाविषयी सर्व जगभर बोलले जात आहे.
Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
1 Corinthians 1:5 in Marathi 5 त्याने तुम्हाला प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे.
Ephesians 1:8 in Marathi 8 “ त्याची ही कृपा आम्हाला सर्व ज्ञानात आणि समजबुध्दीत विपुलतेने पुरवण्यात आली आहे. “
Ephesians 1:15 in Marathi 15 यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि पवित्र जनांवरील तुमच्या प्रीतीविषयी ही ऐकले,
Ephesians 3:14 in Marathi 14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
Ephesians 5:10 in Marathi 10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
Ephesians 5:17 in Marathi 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
Ephesians 6:6 in Marathi 6 मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
Philippians 1:4 in Marathi 4 माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; कारण, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची सुवार्तेच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.
Philippians 1:9 in Marathi 9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
Colossians 1:3 in Marathi 3 आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो
Colossians 1:6 in Marathi 6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
Colossians 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंत:करणात स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
Colossians 4:5 in Marathi 5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
1 Thessalonians 5:17 in Marathi 17 निरंतर प्रार्थना करा.
2 Thessalonians 1:11 in Marathi 11 ह्याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या ह्या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
2 Timothy 1:3 in Marathi 3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुध्द विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
Philemon 1:4 in Marathi 4 मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
Hebrews 10:36 in Marathi 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
James 1:5 in Marathi 5 म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे.म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो दोष न लावता सर्वास उदारपणे देतो;
James 3:17 in Marathi 17 पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुध्द, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
1 Peter 2:15 in Marathi 15 कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुध्द माणसांच्या अज्ञानाला गप्प करावे.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 John 2:17 in Marathi 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.