Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Other Translations King James Version (KJV) To whom God would make known what is the riches of the glory of this mystery among the Gentiles; which is Christ in you, the hope of glory:
American Standard Version (ASV) to whom God was pleased to make known what is the riches of the glory of this mystery among the Gentiles, which is Christ in you, the hope of glory:
Bible in Basic English (BBE) To whom God was pleased to give knowledge of the wealth of the glory of this secret among the Gentiles, which is Christ in you, the hope of glory:
Darby English Bible (DBY) to whom God would make known what are the riches of the glory of this mystery among the nations, which is Christ in you the hope of glory:
World English Bible (WEB) to whom God was pleased to make known what are the riches of the glory of this mystery among the Gentiles, which is Christ in you, the hope of glory;
Young's Literal Translation (YLT) to whom God did will to make known what `is' the riches of the glory of this secret among the nations -- which is Christ in you, the hope of the glory,
Cross Reference Matthew 13:11 in Marathi 11 त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
Luke 17:21 in Marathi 21 ' पाहा,ते येथे आहे किंवा तेथे आहे!असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.'
John 6:56 in Marathi 56 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो.
John 14:17 in Marathi 17 तो खरेपणाचा आत्मा आहे, जग त्याला ग्रहण करू शकत नाही,कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओळखता,कारण तो तुम्हाबरोबर राहतो,आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
John 14:20 in Marathi 20 त्या दिवशी तुम्हाला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
John 14:23 in Marathi 23 येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
John 15:2 in Marathi 2 माझ्यांतील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्याला साफसूफ करतो.
John 17:22 in Marathi 22 तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे ;
John 17:26 in Marathi 26 मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 8:10 in Marathi 10 पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मेलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे.
Romans 8:18 in Marathi 18 कारण मी मानतो की, ह्या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 11:33 in Marathi 33 अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे निर्णय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
1 Corinthians 2:12 in Marathi 12 परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण अोळखून घ्यावे.
1 Corinthians 3:16 in Marathi 16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही काय?
2 Corinthians 2:14 in Marathi 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
2 Corinthians 4:17 in Marathi 17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
2 Corinthians 6:16 in Marathi 16 आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहा. कारण देवाने म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
Galatians 1:15 in Marathi 15 पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याची सुवार्तेची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Galatians 4:19 in Marathi 19 माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीवेदना होत आहेत.
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 2:22 in Marathi 22 त्याच्यामध्ये तुम्हीसुध्दा इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 3:16 in Marathi 16 त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हाला असे द्यावे, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. “
Philippians 4:19 in Marathi 19 माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या व्दारे पुरवील.
Colossians 1:5 in Marathi 5 जी आशा तुमच्यासाठी आकाशात ठेवली आहे ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
Colossians 2:3 in Marathi 3 त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे निधी लपलेले आहेत.
Colossians 3:11 in Marathi 11 ह्यात ग्रीक व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे व सर्वांत आहे.
1 Timothy 1:1 in Marathi 1 देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
Revelation 3:20 in Marathi 20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.