Colossians 1:18 in Marathi 18 तो शरिराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे, आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्याला सर्व गोष्टींत प्राधान्य असावे.
Other Translations King James Version (KJV) And he is the head of the body, the church: who is the beginning, the firstborn from the dead; that in all things he might have the preeminence.
American Standard Version (ASV) And he is the head of the body, the church: who is the beginning, the firstborn from the dead; that in all things he might have the preeminence.
Bible in Basic English (BBE) And he is the head of the body, the church: the starting point of all things, the first to come again from the dead; so that in all things he might have the chief place.
Darby English Bible (DBY) And *he* is the head of the body, the assembly; who is [the] beginning, firstborn from among the dead, that *he* might have the first place in all things:
World English Bible (WEB) He is the head of the body, the assembly, who is the beginning, the firstborn from the dead; that in all things he might have the preeminence.
Young's Literal Translation (YLT) And himself is the head of the body -- the assembly -- who is a beginning, a first-born out of the dead, that he might become in all `things' -- himself -- first,
Cross Reference Matthew 23:8 in Marathi 8 “परंतु तुम्ही स्वतःला ‘गुरूजी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे.
Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 1:16 in Marathi 16 त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
John 1:27 in Marathi 27 तो माझ्या मागून येणारा आहे, त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.”
John 3:29 in Marathi 29 वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलने जो एेकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
John 3:34 in Marathi 34 कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
John 11:25 in Marathi 25 येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
Acts 26:23 in Marathi 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दुःख सहन करील. आणि मेलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.”
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
1 Corinthians 11:3 in Marathi 3 परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे
1 Corinthians 15:20 in Marathi 20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.
1 Corinthians 15:25 in Marathi 25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.
Ephesians 1:10 in Marathi 10 जेणेकरून त्याची ही योजना पूर्ण होेण्यासाठी काळाची पूर्तता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणिल.
Ephesians 1:22 in Marathi 22 “देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवले, आणि त्याला सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले,
Ephesians 4:15 in Marathi 15 “त्याऐवजी आपण प्रीतीने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहेे ,ख्रिस्त
Ephesians 5:23 in Marathi 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. आणि ख्रिस्त विश्वासणाऱ्या शरीराचा तारणारा आहे.
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
Colossians 2:10 in Marathi 10 तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्या ठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,
Hebrews 1:5 in Marathi 5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन ? व तो माझा पुत्र होईल ?
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 1:8 in Marathi 8 प्रभू देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. ”
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.
Revelation 11:15 in Marathi 15 मग सातव्या देवदूताने तुतारी वाजविली तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः ‘जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे, आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. ’
Revelation 21:6 in Marathi 6 आणि तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्याला मी जीवनाच्या झर्याचे पाणी फुकट देईन.
Revelation 21:23 in Marathi 23 आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते, आणि कोकरा तिचा दिवा आहे.
Revelation 22:13 in Marathi 13 मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.