Colossians 1:10 in Marathi 10 ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
Other Translations King James Version (KJV) That ye might walk worthy of the Lord unto all pleasing, being fruitful in every good work, and increasing in the knowledge of God;
American Standard Version (ASV) to walk worthily of the Lord unto all pleasing, bearing fruit in every good work, and increasing in the knowledge of God;
Bible in Basic English (BBE) Living uprightly in the approval of the Lord, giving fruit in every good work, and increasing in the knowledge of God;
Darby English Bible (DBY) [so as] to walk worthily of the Lord unto all well-pleasing, bearing fruit in every good work, and growing by the true knowledge of God;
World English Bible (WEB) that you may walk worthily of the Lord, to please him in all respects, bearing fruit in every good work, and increasing in the knowledge of God;
Young's Literal Translation (YLT) to your walking worthily of the Lord to all pleasing, in every good work being fruitful, and increasing to the knowledge of God,
Cross Reference John 15:8 in Marathi 8 तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
Romans 4:12 in Marathi 12 आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासाला अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
Romans 6:4 in Marathi 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की, जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
2 Corinthians 2:14 in Marathi 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
2 Corinthians 9:8 in Marathi 8 तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हाला सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 1:17 in Marathi 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हाला आपल्या आेळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
Ephesians 2:10 in Marathi 10 कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अारभीच याेजून ठेवले होते. यासाठी त्याप्रमाणे आम्ही चालावे.
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
Ephesians 4:13 in Marathi 13 आपण सगळे देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व त्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या ऐक्यात, प्रौढ मनुष्यपणात, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणात पोहोचेपर्यंत दिले आहेत.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Ephesians 5:10 in Marathi 10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
Ephesians 5:15 in Marathi 15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
Philippians 1:11 in Marathi 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 4:18 in Marathi 18 पण माझ्याजवळ सर्व काही आहे आणि विपुल आहे, आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.
Colossians 2:6 in Marathi 6 आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला.
Colossians 2:19 in Marathi 19 असा माणूस मस्तकापासून धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वाढ होते.
Colossians 3:20 in Marathi 20 मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांच्या आज्ञा पाळा, कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
Colossians 4:5 in Marathi 5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
1 Thessalonians 4:1 in Marathi 1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून एेकून घेतले व त्याप्रमाणे वागत आहा, त्यांत तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
2 Timothy 2:4 in Marathi 4 सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
Titus 3:1 in Marathi 1 त्यांनी सत्ताधीश, व अधिकारी हयांच्या अधीन राहावे.त्यांच्या अाज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे.
Titus 3:14 in Marathi 14 आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी ; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
Hebrews 11:5 in Marathi 5 विश्वासाने, हनोखाने मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्याला लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही. देवाने त्याला लोकांतरी नेले; कारण त्याला लोकांतरी नेण्यापूर्वी त्याने अशी साक्ष मिळवली की, तो देवाला संतोषवीत असे.
Hebrews 13:16 in Marathi 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
2 Peter 1:2 in Marathi 2 देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या आेळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो.
2 Peter 1:8 in Marathi 8 कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आेळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही,असे ते तुम्हास करतील.
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.
1 John 3:22 in Marathi 22 आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे आवडते ते करतो.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.