Acts 9:15 in Marathi 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
Other Translations King James Version (KJV) But the Lord said unto him, Go thy way: for he is a chosen vessel unto me, to bear my name before the Gentiles, and kings, and the children of Israel:
American Standard Version (ASV) But the Lord said unto him, Go thy way: for he is a chosen vessel unto me, to bear my name before the Gentiles and kings, and the children of Israel:
Bible in Basic English (BBE) But the Lord said, Go without fear: for he is a special vessel for me, to give to the Gentiles and kings and to the children of Israel the knowledge of my name:
Darby English Bible (DBY) And the Lord said to him, Go, for this [man] is an elect vessel to me, to bear my name before both nations and kings and [the] sons of Israel:
World English Bible (WEB) But the Lord said to him, "Go your way, for he is my chosen vessel to bear my name before the nations and kings, and the children of Israel.
Young's Literal Translation (YLT) And the Lord said unto him, `Be going on, because a choice vessel to Me is this one, to bear My name before nations and kings -- the sons also of Israel;
Cross Reference Matthew 10:18 in Marathi 18 माझ्यामुळे ते तुम्हाला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीयांना माझ्याविषयी सांगाल.
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
Acts 13:2 in Marathi 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
Acts 21:19 in Marathi 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
Acts 22:21 in Marathi 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
Acts 25:22 in Marathi 22 यावर अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते.” फेस्तने त्याला उत्तर दिले, “उद्या त्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल.”
Acts 26:17 in Marathi 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
Acts 26:32 in Marathi 32 “अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
Acts 27:24 in Marathi 24 आणि तो दूत म्हणाला, ‘पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे. तुझ्याबरोबर प्रवास करणारे जे लोक आहेत, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्याचे देवाने मला वचन दिले आहे.’
Acts 28:17 in Marathi 17 तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुध्द मी काहीही केलेले नाही. तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 1:13 in Marathi 13 बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजिले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
Romans 9:21 in Marathi 21 कुंभाराला एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
Romans 11:13 in Marathi 13 पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो.
Romans 15:15 in Marathi 15 पण मी तुम्हाला आठवण द्यावी म्हणून, तुम्हाला काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हाला लिहिले आहे.
1 Corinthians 15:10 in Marathi 10 पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
Galatians 1:1 in Marathi 1 गलतीयातील मंडळ्यांनाः मी मनुष्यांकडून किंवा मनुष्यांद्वारेही नाही, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले, त्या देवपिता ह्याच्याद्वारे प्रेषित पौल
Galatians 1:15 in Marathi 15 पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याची सुवार्तेची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
Galatians 2:7 in Marathi 7 तर उलट सुंता झालेल्यांना सुवार्ता सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्यांत सुवार्ता सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.
Ephesians 3:7 in Marathi 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
Colossians 1:25 in Marathi 25 आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यात मी मंडळीचा सेवक झालो आहे.
1 Timothy 2:7 in Marathi 7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
2 Timothy 1:11 in Marathi 11 मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
2 Timothy 2:4 in Marathi 4 सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
2 Timothy 2:20 in Marathi 20 मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात.
2 Timothy 4:16 in Marathi 16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुध्द मोजले जाऊ नये.
Revelation 17:14 in Marathi 14 ते कोकर्याशी युध्द करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. ”