Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.” 
             
         
		Other Translations King James Version (KJV) Having therefore obtained help of God, I continue unto this day, witnessing both to small and great, saying none other things than those which the prophets and Moses did say should come:
American Standard Version (ASV) Having therefore obtained the help that is from God, I stand unto this day testifying both to small and great, saying nothing but what the prophets and Moses did say should come;
Bible in Basic English (BBE) And so, by God's help, I am here today, witnessing to small and great, saying nothing but what the prophets and Moses said would come about;
Darby English Bible (DBY) Having therefore met with [the] help which is from God, I have stood firm unto this day, witnessing both to small and great, saying nothing else than those things which both the prophets and Moses have said should happen,
World English Bible (WEB) Having therefore obtained the help that is from God, I stand to this day testifying both to small and great, saying nothing but what the prophets and Moses said would happen,
Young's Literal Translation (YLT) `Having obtained, therefore, help from God, till this day, I have stood witnessing both to small and to great, saying nothing besides the things that both the prophets and Moses spake of as about to come,
		 
	 
	Cross Reference Matthew 17:4 in Marathi 4 पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 
Luke 16:29 in Marathi 29 पण अब्राहाम म्हणाला, “तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ 
Luke 24:27 in Marathi 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. 
Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.” 
Luke 24:46 in Marathi 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, 
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले. 
John 1:45 in Marathi 45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.” 
John 3:14 in Marathi 14 जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाहि उंच केले पाहिजे, 
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. 
John 5:46 in Marathi 46 कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. 
Acts 3:21 in Marathi 21 सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यत स्वर्गात त्याला राहणे अवश्य आहे; त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र भविष्यवाद्याच्या तोंडून सांगितले आहे 
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.” 
Acts 14:19 in Marathi 19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. 
Acts 16:25 in Marathi 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. 
Acts 18:9 in Marathi 9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको! 
Acts 20:20 in Marathi 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 
Acts 21:31 in Marathi 31 ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे. 
Acts 23:10 in Marathi 10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे. 
Acts 23:16 in Marathi 16 तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. 
Acts 24:14 in Marathi 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो. 
Acts 26:6 in Marathi 6 आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरिता मी उभा आहे; 
Acts 26:17 in Marathi 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. 
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. 
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे. 
2 Corinthians 1:8 in Marathi 8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तिपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुध्दा सोडून दिली होती. 
2 Timothy 3:11 in Marathi 11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले. 
2 Timothy 4:17 in Marathi 17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी. आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले. 
Revelation 11:18 in Marathi 18 राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मेलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे. आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. ’ 
Revelation 15:3 in Marathi 3 देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्याचे गीत गात होते. ‘सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. 
Revelation 20:12 in Marathi 12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; आणि तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.