Cross Reference Matthew 4:16 in Marathi 16 अंधारात वावरणाऱ्या लोकांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी, प्रकाश अवतरला.” 
Matthew 6:22 in Marathi 22 “डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल. 
Luke 1:77 in Marathi 77 ह्यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. 
Luke 1:79 in Marathi 79 तीच्याकडून जे अंधारांत आहेत व मृत्यूच्या छायेंत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल. 
Luke 2:32 in Marathi 32 ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या 'इस्राएल' लोकांचें वैभव असे आहे. 
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी 
Luke 11:21 in Marathi 21 जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. 
Luke 24:45 in Marathi 45 नंतर शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी. 
John 1:4 in Marathi 4 त्याच्या ठायी जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. 
John 3:19 in Marathi 19 आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती; 
John 4:10 in Marathi 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” 
John 4:14 in Marathi 14 परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” 
John 7:38 in Marathi 38 जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 
John 8:12 in Marathi 12 पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” 
John 9:5 in Marathi 5 मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” 
John 9:39 in Marathi 39 तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे, आणि ज्यांना दिसते त्यांनी अांधळे व्हावे.” 
John 12:35 in Marathi 35 ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हाला प्रकाश आहे तोवर चाला; यासाठी, अंधकाराने तुम्हाला गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 
John 17:17 in Marathi 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. 
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत, 
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. 
Acts 9:17 in Marathi 17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले,यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.” 
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.” 
Acts 13:38 in Marathi 38 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते. 
Acts 13:47 in Marathi 47 प्रभूने आम्हाला हे करण्यास सांगितले आहे. प्रभू म्हणालाः‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.” 
Acts 15:9 in Marathi 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. 
Acts 20:21 in Marathi 21 पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली. 
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे 
Acts 26:23 in Marathi 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दुःख सहन करील. आणि मेलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.” 
Romans 4:6 in Marathi 6 देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्व गणतो अशा माणसाचा आशीर्वाद दावीददेखील वर्णन करतो. तो असे म्हणतो की, 
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. 
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर. 
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस 
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे. 
1 Corinthians 6:10 in Marathi 10 चोर, लोभी किंवा दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाहीत. 
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत. 
2 Corinthians 4:6 in Marathi 6 कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे. 
2 Corinthians 6:14 in Marathi 14 विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? 
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. 
Galatians 3:2 in Marathi 2 तुम्हाला जो आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी की, विश्वासापूर्वक ऐकल्यामुळे मिळाला,इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. 
Galatians 3:14 in Marathi 14 ह्यांत उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. 
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. 
Ephesians 1:11 in Marathi 11 ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो 
Ephesians 1:14 in Marathi 14 देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीयजनाच्या खडंणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. 
Ephesians 1:18 in Marathi 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे, 
Ephesians 2:8 in Marathi 8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे देवापासूनचे दान आहे, 
Ephesians 4:18 in Marathi 18 “त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.” 
Ephesians 5:8 in Marathi 8 कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. 
Ephesians 5:14 in Marathi 14 कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो. म्हणून असे म्हटले आहे “हे झोपलेल्या जागा हो, अाणि मेलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”. 
Colossians 1:12 in Marathi 12 आणि प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे, म्हणून ज्याने तुम्हाला पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत. 
1 Thessalonians 5:4 in Marathi 4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. 
2 Timothy 2:26 in Marathi 26 आणि सैतानाने आपल्या इच्छे प्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुध्दीवर येतील. 
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले. 
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 
Hebrews 9:15 in Marathi 15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार सर्वकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावतो, त्यांच्याकरता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे. 
Hebrews 10:10 in Marathi 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत. 
Hebrews 10:14 in Marathi 14 कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले. 
Hebrews 11:6 in Marathi 6 पण विश्वासाशिवाय त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे. 
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? 
1 Peter 1:4 in Marathi 4 आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, 
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत. 
1 Peter 2:25 in Marathi 25 कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहा. 
1 John 1:9 in Marathi 9 जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे.म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील. 
1 John 2:8 in Marathi 8 तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे. 
1 John 2:12 in Marathi 12 प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झालेली आहे. 
1 John 3:8 in Marathi 8 जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. 
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः 
Revelation 20:2 in Marathi 2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले, 
Revelation 21:27 in Marathi 27 तेथे कोणतीही अशुध्द गोष्ट, किंवा अमंगळपणाची कृती करणारा किंवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे, प्रवेश करणार नाही. पण कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.