Acts 22:14 in Marathi 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Other Translations King James Version (KJV) And he said, The God of our fathers hath chosen thee, that thou shouldest know his will, and see that Just One, and shouldest hear the voice of his mouth.
American Standard Version (ASV) And he said, The God of our fathers hath appointed thee to know his will, and to see the Righteous One, and to hear a voice from his mouth.
Bible in Basic English (BBE) And he said, You have been marked out by the God of our fathers to have knowledge of his purpose, and to see the Upright One and to give ear to the words of his mouth.
Darby English Bible (DBY) And he said, The God of our fathers has chosen thee beforehand to know his will, and to see the just one, and to hear a voice out of his mouth;
World English Bible (WEB) He said, 'The God of our fathers has appointed you to know his will, and to see the Righteous One, and to hear a voice from his mouth.
Young's Literal Translation (YLT) and he said, The God of our fathers did choose thee beforehand to know His will, and to see the Righteous One, and to hear a voice out of his mouth,
Cross Reference John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
Acts 3:13 in Marathi 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Acts 5:30 in Marathi 30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;
Acts 7:52 in Marathi 52 ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का?ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या गमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.
Acts 9:15 in Marathi 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
Acts 9:17 in Marathi 17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले,यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”
Acts 13:17 in Marathi 17 ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली.आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्याकाळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.
Acts 22:18 in Marathi 18 तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, त्वरा कर , यरूशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.
Acts 24:14 in Marathi 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
Acts 26:16 in Marathi 16 पण ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
1 Corinthians 9:1 in Marathi 1 मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहा ना?
1 Corinthians 11:23 in Marathi 23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हाला दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,
1 Corinthians 15:3 in Marathi 3 कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले,त्यापैकी महत्वाचे हे आहे की, शास्त्रवचनाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांसाठी मरण पावला
1 Corinthians 15:8 in Marathi 8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे, त्या मलासुध्दा तो दिसला.
2 Corinthians 5:21 in Marathi 21 कारण जो पाप जाणत नव्हता त्याला त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे.
Galatians 1:12 in Marathi 12 कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही, तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
Galatians 1:15 in Marathi 15 पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याची सुवार्तेची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
2 Timothy 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
Titus 1:1 in Marathi 1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरु तीत ह्यास,सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी निवडलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल,ह्याच्याकडून:
1 Peter 2:22 in Marathi 22 त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
1 John 2:1 in Marathi 1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.