Acts 15:20 in Marathi 20 तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण , जारकर्म , गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांच्यापासुन तुम्ही अलिप्त असा
Other Translations King James Version (KJV) But that we write unto them, that they abstain from pollutions of idols, and from fornication, and from things strangled, and from blood.
American Standard Version (ASV) but that we write unto them, that they abstain from the pollutions of idols, and from fornication, and from what is strangled, and from blood.
Bible in Basic English (BBE) But that we give them orders to keep themselves from things offered to false gods, and from the evil desires of the body, and from the flesh of animals put to death in ways against the law, and from blood.
Darby English Bible (DBY) but to write to them to abstain from pollutions of idols, and from fornication, and from what is strangled, and from blood.
World English Bible (WEB) but that we write to them that they abstain from the pollution of idols, from sexual immorality, from what is strangled, and from blood.
Young's Literal Translation (YLT) but to write to them to abstain from the pollutions of the idols, and the whoredom, and the strangled thing; and the blood;
Cross Reference Acts 15:29 in Marathi 29 त्या म्हणजे मुर्तीला अर्पीलेले पदार्थ, रक्त, गळा दाबुन मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी ; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेंमकुशल असो.
Acts 21:25 in Marathi 25 जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ते असे, मुर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये. रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ नयेत अनैतिक कृत्ये करू नयेत.”
1 Corinthians 5:11 in Marathi 11 पण आता, मी तुम्हाला लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, किंवा मूर्तिपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा माणसांबरोबर जेवूही नका.
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
1 Corinthians 6:13 in Marathi 13 '' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे”; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे .
1 Corinthians 6:18 in Marathi 18 जारकर्मापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते, पण जारकर्म करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुध्द पाप करतो.
1 Corinthians 7:2 in Marathi 2 तरीही जारकर्म होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा.
1 Corinthians 8:1 in Marathi 1 आता, मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते.
1 Corinthians 8:4 in Marathi 4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही, आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,
1 Corinthians 10:7 in Marathi 7 त्यांच्यापैकी काही जण मूर्तिपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते दैहीकतेने नाच करण्यासाठी उठले.”
1 Corinthians 10:14 in Marathi 14 तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तिपूजा टाळा.
2 Corinthians 12:21 in Marathi 21 किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील, आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.
Galatians 5:19 in Marathi 19 आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः जारकर्म, अमंगळपणा, कामातुरपणा,
Ephesians 5:3 in Marathi 3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुध्दता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही.
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
1 Thessalonians 4:3 in Marathi 3 कारण देवाची इच्छा ही आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दुर राहावे
1 Timothy 4:4 in Marathi 4 तर देवाने अस्तित्वांत आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे , आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीहि वर्ज्य नाही.
Hebrews 12:16 in Marathi 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
Hebrews 13:4 in Marathi 4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व अंथरूण निर्दोष असावे. कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
1 Peter 4:3 in Marathi 3 कारण, परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात.
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Revelation 2:20 in Marathi 20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
Revelation 9:20 in Marathi 20 त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, एेकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.
Revelation 10:2 in Marathi 2 त्याच्याहाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते, त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला,
Revelation 10:8 in Marathi 8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी एेकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी एेकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातलें उघडलेले पुस्तक जाऊन घे.