Acts 14:23 in Marathi 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
Other Translations King James Version (KJV) And when they had ordained them elders in every church, and had prayed with fasting, they commended them to the Lord, on whom they believed.
American Standard Version (ASV) And when they had appointed for them elders in every church, and had prayed with fasting, they commended them to the Lord, on whom they had believed.
Bible in Basic English (BBE) And when they had made selection of some to be rulers in every church, and had given themselves to prayer and kept themselves from food, they put them into the care of the Lord in whom they had faith.
Darby English Bible (DBY) And having chosen them elders in each assembly, having prayed with fastings, they committed them to the Lord, on whom they had believed.
World English Bible (WEB) When they had appointed elders for them in every assembly, and had prayed with fasting, they commended them to the Lord, on whom they had believed.
Young's Literal Translation (YLT) and having appointed to them by vote elders in every assembly, having prayed with fastings, they commended them to the Lord in whom they had believed.
Cross Reference Mark 3:14 in Marathi 14 तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठवता यावे.
Luke 23:46 in Marathi 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, 'पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.'असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
Acts 1:22 in Marathi 22 म्हणजे तो आपणांमध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरूत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
Acts 11:30 in Marathi 30 त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.
Acts 13:1 in Marathi 1 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता), आणि शौल.
Acts 14:26 in Marathi 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
Acts 15:4 in Marathi 4 नंतर ते येरूशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषीत व वडील वर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे घडविले ते त्यांनी सांगितले.
Acts 15:6 in Marathi 6 मग प्रेषीत व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करावयास जमले.
Acts 15:23 in Marathi 23 त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः अंत्युखिया, सूरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बधुजनांचा सलाम.
Acts 20:17 in Marathi 17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
1 Thessalonians 3:12 in Marathi 12 आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
1 Timothy 5:1 in Marathi 1 वडील माणसाला कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्याला बोध कर.
1 Timothy 5:17 in Marathi 17 जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे,
1 Timothy 5:22 in Marathi 22 घाईने कोणावर हात ठेऊ नको, आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुध्द राख.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 2:2 in Marathi 2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांना सोपवून दे.
Titus 1:5 in Marathi 5 मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.
James 5:14 in Marathi 14 तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
2 John 1:1 in Marathi 1 वडिलांकडून, देवाने निवडलेली बाई व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो, आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुध्दा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.
3 John 1:1 in Marathi 1 प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरेपणात प्रीती करणारा वडील ह्याज कडून.