Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Other Translations King James Version (KJV) Confirming the souls of the disciples, and exhorting them to continue in the faith, and that we must through much tribulation enter into the kingdom of God.
American Standard Version (ASV) confirming the souls of the disciples, exhorting them to continue in the faith, and that through many tribulations we must enter into the kingdom of God.
Bible in Basic English (BBE) Making strong the souls of the disciples, saying to them that they were to keep the faith, and that we have to go through troubles of all sorts to come into the kingdom of God.
Darby English Bible (DBY) establishing the souls of the disciples, exhorting them to abide in the faith, and that through many tribulations we must enter into the kingdom of God.
World English Bible (WEB) confirming the souls of the disciples, exhorting them to continue in the faith, and that through many afflictions we must enter into the Kingdom of God.
Young's Literal Translation (YLT) confirming the souls of the disciples, exhorting to remain in the faith, and that through many tribulations it behoveth us to enter into the reign of God,
Cross Reference Matthew 10:21 in Marathi 21 “भाऊ आपल्या भावाविरूध्द व पिता आपल्या मुलाविरूध्द उठेल आणि त्याला विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूध्द उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
Matthew 10:38 in Marathi 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Matthew 19:24 in Marathi 24 मी तुम्हाला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.”
Mark 9:47 in Marathi 47 जर तुझा उजवा डोळा तुला पाप करावयास लावतो तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे.
Mark 10:24 in Marathi 24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!
Mark 10:30 in Marathi 30 अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
Luke 22:28 in Marathi 28 परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात.
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 8:31 in Marathi 31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
John 12:25 in Marathi 25 जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठीे रक्षण करील.
John 15:4 in Marathi 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याला आपल्याआपण फळ देतां येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.
John 15:9 in Marathi 9 जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीहि तुम्हावर प्रीती केली; तुम्ही माझ्या प्रीतीत रहा.
John 15:20 in Marathi 20 ‘दास धन्यापेक्षां मोठा नाही' हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याहि पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
John 16:1 in Marathi 1 “तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
Acts 6:7 in Marathi 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली;याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
Acts 9:16 in Marathi 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
Acts 11:23 in Marathi 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
Acts 13:43 in Marathi 43 भास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
Acts 15:32 in Marathi 32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनाना बोध केला व स्थिरावले .
Acts 15:41 in Marathi 41 आणि मंडळयाना स्थैर्य देत सूरीया व किलिकिया हयामधुन गेला.
Acts 18:23 in Marathi 23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
1 Corinthians 1:8 in Marathi 8 तोच तुम्हाला शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.
Colossians 1:23 in Marathi 23 कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहा, आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
1 Thessalonians 3:2 in Marathi 2 आणि आम्ही आपला बंधु तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हाला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
1 Thessalonians 3:13 in Marathi 13 ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दाेष होण्यासाठी स्थिर करावी.
2 Timothy 1:8 in Marathi 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्या प्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे.
2 Timothy 2:11 in Marathi 11 हे वचन विश्वसनीय आहे की , ''जर आम्ही त्याच्यासह मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू
2 Timothy 3:12 in Marathi 12 खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुध्द जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
1 Peter 4:12 in Marathi 12 प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हाला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
2 Peter 1:11 in Marathi 11 आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.
Jude 1:3 in Marathi 3 प्रियांनो, मी आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला ह्याचे अगत्य वाटले की, जो विश्वास पवित्र जनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हाला लिहून उत्तेजन द्यावे.
Jude 1:20 in Marathi 20 पण प्रियांनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.